इस्लामाबाद : संघामध्ये निवड न झाल्याने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आमिर हानिफ याच्या मुलाने 'अंडर-19 टीम'मध्ये सिलेक्शन न झाल्याने आत्महत्या केली आहे. हानिफ यांचा मोठा मुलगा मोहम्मद जारयाब याने सोमवारी आत्महत्या केली असं वृत्त जिओ न्यूजने दिलं आहे. मात्र, हानिफ यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना , "माझ्या मुलावर दबाव होता, अंडर-19 क्रिकेट टीमच्या कोचमुळेच माझ्या मुलाने आत्महत्या केली'', असा खळबळजनक आरोप केला आहे.
मोहम्मद जारयाब याने जानेवारीत लाहोरमध्ये कराचीकडून एक अंडर-19 टूर्नामेंट खेळली होती. मात्र, दुखापतग्रस्त झाल्याने त्याला त्याला घरी पाठवण्यात आलं होतं. जारयाब याने माघारी जाण्यास नकार दिला पण पुन्हा तुला टीममध्ये घेतलं जाईल असं आश्वासन त्याला देण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र, वय जास्त असल्याचं कारण देत त्याची टीममध्ये निवड करण्यात आली नाही.
हानिफ यांनी 1990 च्या दशकात पाकिस्तानकडून पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Web Title: Former cricketer’s son commits suicide over non-selection
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.