Join us

IPL लिलावातील अनसोल्ड गडी! एका ओव्हरमध्ये ६ चौकार मारत दाखवली 'धमक' (VIDEO)

एका षटकात तामिळनाडूच्या संघाला मिळाल्या २९ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:00 IST

Open in App

Vijay Hazare Trophy, N Jagadeesan Smashed 6 Fours In 6 Balls :  आयपीएलच्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या अन् CSK च्या ताफ्यातून दिसलेल्या विकेट किपर बॅटरनं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील धमाकेदार खेळीनं सर्वांच लक्षवेधून घेतलं आहे. राजस्थान विरुद्धच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना एन जगदीशन याने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याने एकाच षटकात सलग सहा चौकार मारून संघाला अफलातून सुरुवात करून दिली. या षटकात त्याच्या संघाला वाइड चेंडूसह अवांतर धावेच्या रुपात एक चौकार मिळाला. त्यामुळे एका षटकात तामिळनाडूच्या संघाला २९ धावा मिळाल्या.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजस्थानच्या संघानं ठेवलेल्या धावांचा पाठलाग करताना तामिळनाडू संघाला करून दिली धमाकेदार सुरुवात

अभिजीत तोमर १११ (१२५) याने केलेले दमदार शतक आणि कर्णधार महिपाल लोमरोर याने ४९ चेंडूत ३ चौकार आणि ४ अर्धशतकासह कुटलेल्या ६० धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानच्या संघानं ४७.३ षटकात २६७ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूचा विकेट किपर बॅटर एन. जगदीशन याने संघाला दमदार सुरुवात करून दिली. संघाच्या डावातील दुसऱ्या षटकात त्याच्या भात्यातून ६ चेंडूवर ६ खणखीत चौकार निघाल्याचे पाहायला मिळाले.

कडक फटकेबाजीसह साजरे केले अर्धशतक 

पहिल्या विकेटसाठी तुषार रहेजासोबत एन जगदीशन याने ६० धावांची भागीदारी रचली. तुशार ११ धावा करून माघारी फिरल्यावर जगदीशन याने एका बाजूनं आपली फटकेबाजी कायम ठेवत अर्धशतकाला गवसणी घातली.  संघाचे स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी त्याची ही खेळी उपयुक्त अशीच आहे. 

चेन्नईशिवाय KKR च्या ताफ्यातून खेळताना दिसलाय जगदीशन

२०१८ ते २०२२ या कालावधीत एन जगदीशन हा चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. २० लाख या मूळ किंमतीसह तो धोनीच्या संघातून खेळला. २०२३ च्या हंगामात कोलकाताच्या संघाने त्याच्यावर ९० लाख रुपये बोली लावली होती.  पण २०२५ च्या हंगामात तो अनसोल्ड राहिला. ३० लाख या मूळ किंमतीसह त्याने नाव नोंदणी केली होती. 

टॅग्स :विजय हजारे करंडकतामिळनाडूराजस्थानचेन्नई सुपर किंग्स