इंग्लंड क्रिकेटला धक्का देणारी घटना मंगळवारी घडली. १९९०च्या दशकात इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे माजी जलदगती गोलंदाज जोए बेंजामिन ( Joel Benjamin) यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले. बेंजामिन ६० वर्षांचे होते. त्यांनी ३३व्या वर्षी १९९४साली इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याचवर्षी त्यानं वन डे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना दीर्घकाळ खेळता आले नाही, तर कौंटी क्रिकेटमध्ये त्यांनी बरीच वर्ष गाजवली.
त्यांनी सरे क्रिकेट क्लकडून दमदार कामगिरी केली. १९६१मध्ये कॅरेबियन बेट सेंट किट्स येथे त्यांचा जन्म झाला आणि १५ वर्षांचे असताना ते कुटुबीयांसह ब्रिटेनमध्ये स्थायिक झाले. त्यांनी वॉर्विकशर कौंटीतून खेळण्यास सुरुवात केली. २७ वर्षांचे असताना त्यांनी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. १९८८मध्ये त्यांनी वॉर्विकशरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १९९२नंतर ते सरे क्लबकडून खेळू लागले. त्यांनी प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये मिळून 560 विकेट्स घेतल्या आहेत.