Join us  

"या क्षणी राजीनामा म्हणजे एक विनोद"; स्टोक्सच्या निवृत्तीवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान

इंग्लंडच्या संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:49 AM

Open in App

लंडन: इंग्लंडच्या संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो मंगळवारी १९ जुलै आपल्या कारकिर्दितील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल. इंग्लंडच्या संघाला २०१९ चा विश्वचषक जिंकून देण्यामध्ये बेन स्टोक्सची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विश्वचषकाचा किताब जिंकून झाल्यानंतर तीन वर्षांनंतर स्टोक्सच्या राजीनाम्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे स्टोक्सच्या या निर्णयावर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने नाराजी व्यक्त केली आहे.

२०१९ च्या विश्वचषकातील फायनलचा सामना फारच लोकप्रिय आणि ऐतिहासिक ठरला होता. मानसिक आरोग्य, विश्रांती आणि वर्कलोड असतानाही बेन स्टोक्स मैदानात पाहायला मिळाला. इंग्लंडच्या या स्टारने आपल्या विधानात 'अस्थिर' वेळापत्रकाचा विशेष उल्लेख केला आहे. यावरूनच आता संघाचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने स्काय स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटले की, ही समस्या केवळ ईसीबी रॉब किंवा स्टोक्स यांच्याबाबतच नाही, असं म्हणत हुसैनने अस्थिर वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले. 

नासिर हुसैनने नेमकं काय म्हटलं?

हे सगळं वेळापत्रकावर अवलंबून आहे. जर ICC फक्त त्यांच्या कार्यक्रमांमध्ये गुंतली असेल आणि अनेक बोर्ड शक्य तितकी ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत असतील म्हणजेच आयसीसीची स्पर्धा नसताना इतर स्पर्धांचे आयोजन होत असेल. तर क्रिकेटर साहजिकच म्हणतील की आता हे खूप झालं आहे. बेन स्टोक्सला वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी एकदविसीय क्रिकेटमधून निवृत्त व्हावं लागत आहे हे खरोखरच चुकीचं आहे. वेळापत्रकावर विचार करण्याची गरज असून या क्षणी स्टोक्सचा राजीनामा हा एक विनोदाचा भाग आहे, अशा शब्दांत नासिर हुसैनने आयसीसीला आपले शेड्यूल पाहण्याची गरज असल्याचे म्हटले.

दरम्यान, बेन स्टोक्स आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा आणि १५० वा एकदिवसीय सामना खेळेल. हा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. मात्र स्टोक्सने तडकाफडकी निवृत्ती घेण्याऐवजी काही सामने विश्रांती घेतली असती तर ते चांगलं झालं असतं असे हुसैनने स्पष्ट केले. तसेच ५० षटकांच्या क्रिकेटमधून एवढ्यात निवृत्त होणं म्हणजे हे एक आश्चर्य आहे, असेही त्याने सांगितले.

टॅग्स :इंग्लंडबेन स्टोक्सलंडनक्रिकेट सट्टेबाजी
Open in App