Join us  

टॉप गियर शूटींगदरम्यान इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा अपघात

Andrew Flintoff: पुढील उपचारासाठी एअरलिफ्ट करून त्याला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 8:04 AM

Open in App

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि ऑलराऊंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ याचा सोमवारी भीषण कार अपघात झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ४५ वर्षीय फ्लिंटॉफला एअरलिफ्ट करून हॉस्पिटलला पोहचवले. बीबीसी शो टॉप गियरच्या एका एपिसोडच्या चित्रिकरणावेळी हा अपघात झाला.   सरे येथील डन्सफोल्ड पार्क एरोड्रोम येथे बर्फाळ परिस्थितीत तो शूट करत होता. 

बीबीसीनं दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, टॉप गियर टेस्ट ट्रॅकवेळी सोमवारी सकाळी फ्लिंटॉफचा अपघात झाला. तेव्हा क्रू मेंबर आणि मेडिकल टीमने तातडीने तपासणी केली. त्यानंतर पुढील उपचारासाठी एअरलिफ्ट करून त्याला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. फ्लिंटॉफचा अपघात जीवघेणा नसल्याने चिंता नाही. कारण तो ट्रॅकवर अगदी नॉर्मल स्पीडमध्ये होता. वेगाने कार चालवत नव्हता. २०१९ मध्ये टॉप गियर शोच्या शूटींगवेळीही फ्लिंटॉफचा अपघात झाला होता. 

फ्लिंटॉफने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २००७ मध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंगला मैदानात उकसवलं होते. एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंग म्हणाला की, फ्लिंटॉफनं मला गळा कापण्याची धमकी दिली होती. त्याच मॅचमध्ये युवीने स्टुअर्ड ब्रॉडला एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते.  

Open in App