Join us  

LLC 2023 : मी IPL च्या लिलावात कसा उतरू? ४३ वर्षीय इंग्लिश खेळाडूने व्यक्त केली इच्छा

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 2:59 PM

Open in App

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. मात्र, इंग्लंडच्या ४३ वर्षीय खेळाडूनं सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचं लक्ष वेधलं. इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने पुन्हा एकदा आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा पीटरसन सध्या भारतात आहे आणि लीजेंड्स लीग २०२३ मध्ये इंडिया कॅपिटल्सकडून खेळत आहे. या स्पर्धेत मागील गुरुवारी मणिपाल टायगर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ५६ धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर त्याने आयपीएल लिलावात प्रवेश करण्याबाबत एक मिश्किल टिप्पणी केली.

लीजेंड्स लीगच्या माध्यमातून दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरले आहेत. इंडिया कॅपिटल्सच्या पीटरसनने मणिपाल टायगर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात २७ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. पीटरसनची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नसली तरी, यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भन्नाट पोस्ट शेअर केली. "मी IPL च्या लिलावात कसा उतरू शकतो?", असे पीटरसनने कॅप्शनमध्ये म्हटले.

मणिपाल टायगर्सचा ६ गडी राखून विजयमणिपाल टायगर्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, टायगर्सच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ करून सामना एकतर्फी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १७७ धावा केल्या. केविन पीटरसनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. पण, पीटरसनशिवाय एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना मणिपाल टायगर्सने १८.४ षटकांत ४ गडी राखून विजय मिळवला.

लीजेंड्स लीग क्रिकेट २०२३ संघ -

  1. इंडिया कॅपिटल्स
  2. गुजरात जायंट्स
  3. भिलवारा किंग्स
  4. मनिपाल टायगर्स 
  5. साउथर्न  सुपरस्टार्स
  6. अर्बनराईजर्स हैदराबाद
टॅग्स :आयपीएल २०२३आयपीएल लिलावइंग्लंड