पाकिस्तानचा संघ भारताच्या पाहुणचाराने भारावला; इरफान पठाणने लगेच चिमटा काढला

एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाचे बुधवारी रात्री हैदराबादमध्ये आगमन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:51 PM2023-09-28T13:51:07+5:302023-09-28T14:00:16+5:30

whatsapp join usJoin us
Former fast bowler of Indian cricket team Irfan Pathan has taunt to Pakistan team by tweeting. | पाकिस्तानचा संघ भारताच्या पाहुणचाराने भारावला; इरफान पठाणने लगेच चिमटा काढला

पाकिस्तानचा संघ भारताच्या पाहुणचाराने भारावला; इरफान पठाणने लगेच चिमटा काढला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाचे बुधवारी रात्री हैदराबादमध्ये आगमन झाले. यावेळी, कडक सुरक्षा व्यवस्थेत पाकिस्तान संघाला हॉटेलमध्ये नेण्यात आले. यावेळी विमानतळावर क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तानी खेळाडूंचे स्वागत केले. २०१६ मध्ये पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय संघ भारतीय भूमीत उतरला होता.

२९ सप्टेंबरला पाकिस्तान संघ २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. पण, या सामन्यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. यानंतर पाकिस्तानचा संघ ३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारतीयांकडून झालेले स्वागत पाहून बाबर भारावला अन् त्याने इंस्टाग्रावर तशी पोस्ट लिहिली. तसेच या स्वागतासाठी पाकिस्तानी सोशल मीडियावर भारताचे आभार मानत आहेत. सोशल मीडियावर पाकिस्तानी चाहते तर विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत करत आहेत आणि भारताच्या आदरातिथ्याचे कौतुक करत आहेत.

पाकिस्तानचा संघा भारताने केलेल्या स्वागतामुळे भारावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण याने लगेच चिमटा काढला आहे. इरफान पठाण ट्विट करत म्हणाला की, आमच्या स्वागतामुळे काहीजण आर्श्चयचकित झाले आहे. मात्र केवळ क्रिकेटच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही सर्वोत्तम आहोत. एक राष्ट्र आणि लोक म्हणून आम्ही असेच आहोत. 

दरम्यान, बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला व्हिसा मिळण्यास विलंब झाला . त्यामुळे त्याच्या संघाला भारतात पोहोचण्यास वेळ लागला. त्यामुळे दुबईत होणारे पाकिस्तान संघाचे शिबिरही रद्द करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट संघाने पहिल्यांदा लाहोर ते दुबई असा प्रवास केला. त्यानंतर ते दुबईहून भारतातील हैदराबाद येथे पोहोचले. पाकिस्तान संघ ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कपची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

पाकिस्तानचा संघ:- बाबर आझम (कर्णधार) , शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर.

Web Title: Former fast bowler of Indian cricket team Irfan Pathan has taunt to Pakistan team by tweeting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.