rahul dravid net worth : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे आगामी आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचे गुरू म्हणून दिसणार असल्याचे कळते. राजस्थानच्या फ्रँचायझीने द्रविड यांच्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे असे झाल्यास द्रविड यांना चांगले मानधन मिळेल. माहितीनुसार, प्रशिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या द्रविड यांना २ ते ३ कोटी रुपये मिळू शकतात. आयपीएल संघांचे मुख्य प्रशिक्षक पगार म्हणून चांगली रक्कम घेतात. रिपब्लिक वर्ल्डच्या एका वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांना २.३ कोटी रुपये मिळतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनाही चांगला पगार मिळतो. एका हंगामासाठी ते सुमारे ३.२ कोटी रुपये घेतात. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आहेत. CSK त्यांना सुमारे ३.५ कोटी रुपये मानधन देते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. फ्लेमिंग यांच्यासोबतच रिकी पाँटिंगलाही चांगला पगार होता. तो दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक होता. मात्र, आता तो संघापासून वेगळा झाला आहे. पाँटिंगला साडेतीन कोटी रुपये दिले जात असत. आयपीएल २०२५ पूर्वी अनेक संघांनी कोचिंग स्टाफमध्ये बदल केले आहेत. मेगा लिलावापूर्वी आणखी काही लक्षणीय बदल होऊ शकतात.
राहुल द्रविड मोठ्या कालावधीपर्यंत राजस्थानच्या संघाचा भाग राहिले आहेत. २०१३ मध्ये ते राजस्थानच्या संघाचे कर्णधार बनले. त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२० फायनल आणि आयपीएलच्या प्लेऑफपर्यंत संघाला नेले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. तेव्हा राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला होता. आताच्या घडीला राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कुमार संगकारा कार्यरत आहे. २०१५ पासून राहुल द्रविड बीसीसीआयशी जोडले गेले, त्यांनी भारताच्या अंडर-१९ आणि भारत अ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. मग एनसीएमध्ये अध्यक्षपदाचा कारभार सांभाळला. अखेर ऑक्टोबर २०२१ पासून त्यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली.
Web Title: Former head coach of Team India Rahul Dravid is likely to become the coach of Rajasthan Royals team in IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.