BCCI Award : भारताचे महान अष्टपैलू खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) २३ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहे. शास्त्री यांच्यासोबत शुबमन गिलला क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळेल. गिलने वन डे फॉर्मेटमध्ये २९ डावांत ६३.३६ च्या सरासरीने १५८४ धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. चार वर्षानंतर बीसीसीआय वार्षिक पुरस्कार देणार आहेत.
न्यूझीलंडविरुद्धचे द्विशतक हे शुबमनचे वैशिष्ट्य होते. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमलाचा १२ वर्षांहून अधिक काळ असलेला विक्रम मोडून तो वन डेमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारा फलंदाज ठरला. चार वर्षांहून अधिक कालावधीच्या दीर्घ विश्रांतीनंतर बीसीसीआय पुरस्कारांचे आयोजन करण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या अगोदर म्हणजेच २३ जानेवारीला हैदराबादमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांची उपस्थिती अपेक्षित आहे.
६१ वर्षीय शास्त्री यांनी ८० कसोटी आणि १५० वन डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६९३८ धावा आणि २८० विकेट्स आहेत. आता ते समालोचकाच्या भूमिकेत आहेत. शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, भारताने ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग कसोटी मालिका जिंकल्या, असा पराक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता.