भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू, इंडियन प्रीमिअर लीगमधील Mr IPL सुरेश रैना ( Suresh Raina) याने मंगळवारी आयपीएल व स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने सर्व चाहत्यांचे, BCCI, CSK यांचे आभार मानून निवृत्तीचा निर्णय ट्विटरद्वारे सर्वांना कळवला. पण, निवृत्तीच्या तासाभरानंतरच मोठी अपडेट्स समोर आले आहेत आणि सुरेश रैना भारतीय संघाचे पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. रैनाने १८ कसोटी, २२६ वन डे व ७८ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यात त्याने अनुक्रमे ७६८ धावा, ५६१५ धावा व १६०५ धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६२ विकेट्सही आहेत. रैनाने आयपीएलच्या २०५ सामन्यांमध्ये ५५२९ धावा केल्या आहेत आणि ज्यात २ शतकं आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.
निवृत्तीच्या या घोषणेनंतर तासाभरातच सुरेश रैना पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार असल्याचे वृत्त समोर आले. १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या Road Safety World Series 2022 स्पर्धेत तो इंडियन लीजंड्स ( Indian Legends) कडून खेळणार असल्याचे RSWS च्या ट्विटर हँडलवर जाहीर करण्यात आले. त्यामुळे सचिन तेंडुलकर, युवराज सिंग व हरभजन सिंग यांच्यासह सुरेश रैना पुन्हा एका खांद्याला खांदा लावून खेळताना दिसणार आहे.