भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय संबंध जगजाहीर आहेत. पाकिस्तानातून होत असलेल्या दहशतवादी कुरापतींमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळेच दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकाही रद्द झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांमध्ये आणि आशिया चषक स्पर्धेत उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. पण, या दोन्ही देशांमधील अनेक खेळाडूंनी जगातील दिग्गज क्रिकेटपटूंना एकेकाळी रडकुंडीला आणले आहेत. हाच निकष लावून भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रानं भारत-पाकिस्तान या दोन देशांचा मिळून एक सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला, परंतु त्याचे नेतृत्व पाकिस्तानी खेळाडूकडे सोपवल्यानं नाराजीचा सूर उमटत आहे.
कोरोनामुळे IPL 2020 न होणे ही लाजीरवाणी गोष्ट; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजाची मुक्ताफळं
या संघाची निवड करताना प्रचंड डोकेदुखी झाली, असं चोप्रानं सांगितले. कारण, दोन्ही देशांमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. चोप्रानं निवडलेल्या या संघात भारतीय फलंदाजांचे वर्चस्व दिसत आहे, तर गोलंदाजी विभागात पाकिस्तानी खेळाडूंचा दबदबा जाणवत आहे. चोप्राच्या या संघात सलामीला पाकिस्तानच्या सईद अनवरला आणि भारताच्या सुनील गावस्कर यांना स्थान दिले आहे. दुसरा सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवागची निवड केली गेली आहे.
मधल्या फळीची जबाबदारी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अनुक्रमे इंझमाम-उल-हक आणि जावेद मियाँदाद यांची निवड केली गेली आहे. सातव्या क्रमांकासाठी यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीची निवड केली गेली. त्यानंतर कपिल देव, इमरान खान, वसीम अक्रम आणि अनिल कुंबळे यांना स्थान दिले गेले आहे. विशेष म्हणजे चोप्रानं या संघाचे नेतृत्व इमरान खान यांच्या खांद्यावर सोपवले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनमध्ये दिग्गज खेळाडूची 'Sex Party'; कॉलगर्ल्सना बोलावलं घरी!
Sad : दिग्गज फुटबॉल प्रशिक्षकाच्या आईचे Corona मुळे निधन
हिंदू खेळाडूच्या विनंतीचा राखला मान.... शाहिद आफ्रिदीकडून पाकमधील हिंदूंना मदत
उपाशी पोटी झोपी नका, मला मेसेज करा; बेशिस्त अन् बेलगाम म्हणून कुप्रसिद्ध खेळाडूची दिलदारी
... म्हणून ऑसी खेळाडू विराटशी पंगा घ्यायला घाबरतात, मायकेल क्लार्कचा गंभीर आरोप