मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यंदाच्या लोकसभा निडवणुकीत मतदान करू शकणार नाही. मतदार यादीतून त्याचे नाव वगळण्यात आले आहे.
2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकी दरम्यान द्रविडने आपले घर बदलले आणि त्यामुळे त्याने इंदिरानगर मतदारसंघातून आपले नाव कमी केले. दरम्यान, नवीन मतदारसंघात नाव त्याला नाव नोंदवता आले नाही. भारताच्या माजी क्रिकेटपटून जुन्या मतदारसंघातून नाव वगळण्यासाठी सर्व कागदपत्रे जमा केली होती, परंतु नवीन मतदारसंघात नाव नोंदवण्याची प्रक्रीया त्याने केली नाही. त्यामुळे त्याचे नाव यंदाच्या मतदार यादीतून गायब आहे. आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद यांनी ही माहिती दिली.
''ज्यावेळी नाव कमी करण्याची प्रक्रीया करण्यात आली त्याच वेळी मतदाराने नवीन मतदारसंघात नाव नोंदवण्याची प्रक्रीया करायची असते. आमचे अधिकारी दोनवेळा द्रविडच्या घरी गेले होते, परंतु त्यांना घरात प्रवेश दिला गेला नाही. द्रविड परदेश दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले आणि नाव नोंदवण्यासंदर्भात द्रविडकडूनही कोणताच मॅसेज आला नाही,'' अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
मतदान करणाऱ्यांची पहिली यादी जानेवारीत प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अंतिम यादी 16 मार्चला जाहीर करण्यात येईल. तत्पूर्वी द्रविडने फॉर्म 6 भरून नाव नोंदणीसाठी अर्ज करावा, अन्यथा आम्ही काहीच करू शकत नाही, असे अतिरिक्त निवडणूक अधिकारी केएन रमेश यांनी सांगितले. द्रविड हा भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे आणि त्याच्या अडचणी आम्ही समजू शकतो.