भारताचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज असलेल्या विरेंद्र सेहवाग याने ख्रिस गेल याची तुलना महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत केली आहे. सेहवागने ट्विट केले की, टी२० चा ब्रॅडमन ख्रिस गेल हा टी २० क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. ’
गेल याने टी २० मध्ये राजस्थान विरोधातील सामन्यात १००० वा षटकार ठोकला आहे. त्याची टी २० क्रिकेटमधील कामगिरी अफलातून आहे. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर त्याने संघाला कायमच विजय मिळवून दिला. त्याने आतापर्यंत जगभरातील विविध टी२० क्रिकेट लीग आणि आंतरराष्ट्रीय सामने पाहता त्याच्या कामगिरीची तुलना सेहवागने ब्रॅडमन यांच्या कामगिरीसोबत केली आहे.
गेल याने आतापर्यंत टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात १०५ षटकार तर आयीएलमध्ये ३४९ षटकार लगावले आहेत. त्याने आयपीएलमध्ये खेळताना टी२० मध्ये सर्वाधिक १७५ धावांची खेळी केली आहे. गेल याने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर, रॉयल
चँलेजर बंगलुरू या संघांकडून खेळ केला आहे. त्या शिवाय तो बांगलादेश प्रीमियर लीग, बिग बॅशलीग, कॅरेबियन प्रीमियर लीग यासारख्या विविध
लीगमधून खेळ करतो.
Web Title: Former India cricketer Chris Gayle compared to Bradman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.