Join us  

गौतम गंभीर LSGची साथ सोडण्याच्या तयारीत; एका माजी खेळाडूची निवड ठरतेय कारण? 

गौतम गंभीर याने IPL 2024 पूर्वी लखनौ सुपरजायंट्सची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 4:11 PM

Open in App

Indian Premier League 2024 - भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि आयपीएल विजेता कर्णधार गौतम गंभीर याने IPL 2024 पूर्वी लखनौ सुपरजायंट्सची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे. गौतम गंभीर हा LSGचा मार्गदर्शक आहे, परंतु मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यानंतर आता तोही LSGची साथ सोडणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. कालच आयपीएल फ्रँचायझीने त्यांच्या धोरणात्मक सल्लागारपदी BCCIचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांची निवड जाहीर केली होती. याच प्रसाद यांच्यासोबत गंभीरचे अंबाती रायुडूला न निवडण्यावरून शाब्दिक भांडण झाले होते.

अँडी फ्लॉवर यांच्याजागी LSGने मुख्य प्रशिक्षकपदी जस्टीन लँगर यांची निवड केली आहे. ''अँडी फ्लॉवर यांच्यानंतर गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडण्याच्या तयारीत आहे... यापेक्षा मी काही जास्त सांगू शकत नाही,''असे सूत्रांनी एका हिंदी वृत्तपत्राला सांगितले. याआधीही गंभीर हे कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात पुन्हा जाणार असल्याची चर्चा रंगली होती. KKR व्यवस्थापकही मागील काही कालावधीपासून गंभीरशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करत होते. 

दिल्ली डेअरडेव्हिल्सनंतर गंभीर २०११ मध्यो कोलाकाताच्या ताफ्यात दाखल झाला होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१२ मध्ये अजिंक्यपद पटकावले होते आणि २०१४ मध्ये त्याची पुनरावृत्ती केली.  सध्या गंभीर अमेरिकेत मास्टर्स टी१०लीगमध्ये सहभाग घेण्यासाठी गेला आहे. त्याच्यासह २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सहकारी युसूफ पठाण हा न्यू जर्सी ट्रायटन्सकडून खेळणार आहे. या लीगमध्ये माँटी पानेसर, आरपी सिंग, अॅलबी मॉर्केल, लिएम प्लंकेट, जेस रायडर, क्रेग मॅकमिलन हेही खेळणार आहेत. 

लखनौ सुपर जायंट्सची IPL 2024 ची तयारीकर्णधार - लोकेश राहुलमार्गदर्शक - गौतम गंभीरमुख्य प्रशिक्षक - जस्टीन लँगरगोलंदाज प्रशिक्षक- मॉर्ने मॉर्केलक्षेत्ररक्षण प्रशिक्षक - जाँटी ऱ्होड्सधोरणात्मक सल्लागार - एमएसके प्रसाद 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सगौतम गंभीर
Open in App