काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'

स्वप्नवत क्रिकेट संघाची चर्चा होते, त्यावेळी क्रिकेट जगतात अधिराज्य गावणारा विराट कोहली, रोहित शर्मा आणि भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी या मंडळींचा उल्लेख अपेक्षित असतो. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:23 AM2024-09-17T11:23:09+5:302024-09-17T11:24:57+5:30

whatsapp join usJoin us
Former India cricketer Yuvraj Singh Reveals Top 3 Choices For His Dream Playing XI But No MS Dhoni Virat Kohli Or Rohit Sharma In Team | काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'

काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Yuvraj Singh Reveals Top 3 Choices For His Dream Playing XI : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने आपल्या ड्रीम टीममधील टॉप ३ खेळाडूंची नावे सांगत सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडलं आहे. स्वप्नवत क्रिकेट संघाची चर्चा होते, त्यावेळी क्रिकेट जगतात अधिराज्य गावणारा विराट कोहली, रोहित शर्मा आणि भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी या मंडळींचा उल्लेख अपेक्षित असतो. 

युवीनं दिला नाही धोनी, विराट अन् रोहितला भाव

जर एखाद्या ड्रीम इलेव्हनमध्ये विराट, रोहित आणि माजी कॅप्टन धोनी यातील एक खेळाडूही नसेल तर अनेकांना ती इलेव्हन खटकणारी ठरते. युवराज सिंग यानेही अशी अनेक चाहत्यांना खटकणारी गोष्ट बोलून दाखवली आहे. धोनीला सोडाच पण किंग कोहली आणि रोहित शर्मालाही त्याने किंमत दिलेली दिसत नाही. युवराज सिंग याने आपल्या ड्रीम इलेव्हनमधील टॉप ३ खेळाडूंमध्ये एका भारतीयासह दोन परदेशी खेळाडूंना पसंती दिली आहे.  

युवीच्या ड्रीम इलेव्हनमधील टॉप ३ मध्ये कोण?


युवराज सिंग याने स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये आपल्या ड्रीम इलेव्हनमधील आघाडीच्या तीन खेळाडूंची नावे सांगितली आहेत. या खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला त्याने पसंती दिल्याचे दिसते. त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स आणि गोलंदाजीमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराह याचे नाव त्याने घेतले.

टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी एकदा नव्हे तर दोन वेळा उचलला मोलाचा वाटा

२००७ मध्ये भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराज सिंग याने मोलाची कामगिरी बजावली होती. एवढेच नाही तर २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघाला चॅम्पियन करण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर युवराज सिंग हा लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसते. 

IPL मध्ये नव्या भूमिकेत दिसणार युवी?

युवराज सिंग हा आयपीएलमध्येही वेगवेगळ्या फ्रेंचायझी संघाकडून खेळताना दिसला आहे. आगामी आयपीएलमध्ये तो एका नव्या भूमिकेत या लीगशी कनेक्ट होणार असल्याची चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्समधील रिकी पाँटिंगच्या जागेवर युवीची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय गुजरात टायटन्सचा संघही त्याला आपल्या कोचिंग स्टाफमध्ये सामील करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.  

Web Title: Former India cricketer Yuvraj Singh Reveals Top 3 Choices For His Dream Playing XI But No MS Dhoni Virat Kohli Or Rohit Sharma In Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.