न्यूझीलंडविरुद्धच्या रांची येथील ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारताचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) याने हर्षल पटेल याला पदार्पणाची कॅप दिली. क्रिकेटनंतर समालोचनाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अजित आगरकरला पुन्हा मैदानावर पाहिल्यानंतर चाहते सुखावले. त्याच्या बाजूला माजी सहकारी आणि आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड उभा होता. आगरकर-द्रविड ही जोडी आता पुन्हा टीम इंडियाच्या ताफ्यात सोबत दिसण्याची चर्चा सुरू आहे. आगरकरकडे टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, त्याआधी दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) त्याला सहाय्यक प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे.
दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये बरेच बदल करत आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याला सहाय्य म्हणून अजित आगरकरची निवड केली आहे. रिषभ पंत हा संघाचा कर्णधार आहे, तर प्रवीण आम्रे फलंदाजी प्रशिक्षक व जेम्स होप्स हे गोलंदाज प्रशिक्षक आहेत. दिल्ली कॅपिटल्स हे मोहम्मद कैफ व अजय रात्रा यांचा करार वाढवणार नाही. कैफ हा २०१९पासून DC सोबत आहे, तर रात्रा २०२१च्या हंगमातच संघासोबत होता. भारत-श्रीलंका यांच्यातल्या मालिकेनंतर अजित आगरकर दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकाची सूत्रे हाती घेणार आहे. तो स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग टीमचा सदस्य आहे.
४४ वर्षीय आगरकरने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, परंतु त्याने २००७मध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. आगरकरच्या नावावर वन डेत २८८ आणि कसोटीत ५८ विकेट्स आहेत. २०१२-१३मध्ये रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाचे प्रथमच नेतृत्व सांभाळताना त्याने जेतेपदाचा चषक उंचावला होता. २०११ ते २०१३ या कालावधीत तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला होता. २००८ व २०१०मघ्ये कालकाता नाइट रायडर्सचा सदस्य होता. त्याने ६२ ट्वेंटी-२०त ४७ विकेट्स घेतल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा कोचिंग स्टाफ ( Delhi Capitals Coaching Staff)
- रिकी पाँटिंग - मुख्य प्रशिक्षक
- शेन वॉटसन - सहाय्यक प्रशिक्षक
- अजित आगरकर - सहाय्यक प्रशिक्षक
- जेम्स होप्स - जलदगती गोलंदाज प्रशिक्षक
- साबा करिम - टीम स्काऊट व सल्लागार
- दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, रिषभ पंत, अक्षर पटेल, एन्रिक नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर ( ६.२५ कोटी), मिचेल मार्श ( ६.५० कोटी), शार्दूल ठाकूर ( १०.७५ कोटी), मुस्तफिजूर रेहमान ( २ कोटी), कुलदीप यादव ( २ कोटी), अश्विन हेब्बर ( २० लाख), सर्फराज खान ( २० लाख), कमलेश नागरकोटी ( १.१० कोटी), के. एस भारत ( २ कोटी), मनदीप सिंह ( १.१० कोटी), खलील अहमद ( ५.२५ कोटी), चेतन साकरिया ( ४.२० कोटी), यश धूल ( ५० लाख), रिपल पटेल ( २० लाख), ललित यादव ( ६५ लाख), रोवमन पॉवेल ( २.८० कोटी), प्रविण दुबे ( ५० लाख), लुंगी एनगिडी ( ५० लाख), विकी ओस्तवाल ( २० लाख), टीम सेईफर्ट ( ५० लाख).
Web Title: Former India fast bowler Ajit Agarkar is set to join Delhi Capitals as an assistant coach
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.