Legends League Cricket : सप्टेंबर महिना हा क्रिकेट चाहत्यांना ९०च्या दशकात पुन्हा घेऊन जाणारा ठरणार आहे. सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आदी भारताचे माजी स्टार खेळाडू Legends League Cricket च्या निमित्ताने पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. १६ सप्टेंबरला इंडियन महाराजा व वर्ल्ड जायंट्स यांच्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष सामना खेळवला जाणार आहे. १७ सप्टेंबरपासून Legends League Cricket लीगला सुरुवात होतेय. त्यात आता भारताचा आणखी एका वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे.
भारताचा माजी सलामीवीर आणि कर्णधार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा Legends League Cricket लीगच्या दुसऱ्या पर्वात खेळणार आहे. २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व २०११च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघातील गंभीर हा महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. २०११च्या वन डे वर्ल्ड कप फायलनमधील त्याच्या ९७ धावांच्या खेळीने भारताला २८ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलाल होता. त्याने १४७ वन डे व ३७ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ६०००+ धावा केल्या आहेत. याशिवाय इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला त्याने २०१२ व २०१४ मध्ये जेतेपद जिंकून दिले आहे. ''१७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या Legends League Cricket लीगच्या दुसऱ्या पर्वात मी खेळणार आहे. पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यासाठी उत्सुक आहे,''असे गौतम गंभीरने सांगितले. इंडियन महाराजा संघाचे कर्णधारपद सौरव गांगुली करतोय, तर वर्ल्ड जायंट्सचे नेतृत्व इयॉन मॉर्गनकडे आहे. आतापर्यंत १० देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. चार संघांचा या लीगमध्ये सहभाग असणार आहे आणि एकूण १५ सामने होणार आहेत.
इंडियन महाराजा संघ - सौरव गांगुल ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी
रेस्ट ऑफ वर्ल्ड - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा,मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन,