Join us  

BCCI New Selection Committee : भारताच्या वर्ल्ड कप अपयशाला IPLजबाबदार; धाडसी विधान करणारा खेळाडू निवड समितीचा अध्यक्ष होणार!

BCCI New Selection Committee - भारतीय संघाच्या निवड समितीची लवकरच घोषणा होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 1:42 PM

Open in App

BCCI New Selection Committee - भारतीय संघाच्या निवड समितीची लवकरच घोषणा होणार आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बीसीसीआय निवड समितीच्या नवीन अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद हे निवड समितीच्या पदासाठी अर्ज करणारे सर्वात कुशल क्रिकेटपटू आहेत आणि लवकरच नवीन अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय नवीन समितीमधील एक निवडकर्ता म्हणून ट्वेंटी-२० विशेषज्ञ शोधत आहे 

५३ वर्षीय प्रसादने भारतासाठी ३३ कसोटी आणि १६१ वन डे सामने खेळले आहेत. त्याने २९० आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत आणि नवीन निवडकर्ता पदासाठी अर्ज करणारा तो सर्वात अनुभवी क्रिकेटर आहे. “नवीन निवड समिती या महिन्याच्या अखेरीस अंतिम केली जाईल आणि त्याची घोषणा केली जाईल. व्यंकटेश प्रसाद हा या भूमिकेसाठी अर्ज केलेल्या सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. कोणतीही औपचारिक चर्चा झाली नाही परंतु नवीन अध्यक्ष म्हणून त्यांना सर्वांकडून विश्वासाचे मत मिळण्याची शक्यता आहे”, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळच्या सूत्राने माहिती दिली.

आयपीएल आल्यापासून भारत वर्ल्ड कप जिंकलेला नाही...प्रसाद यांनी आणखी एक ट्विट करून बीसीसीआयला सल्ला दिला आहे. "आयपीएल सुरू झाल्यापासून आम्ही एकही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही आणि मागील पाच वर्षांत एखादी द्विपक्षीय मालिका जिंकण्याशिवाय वन डे सामन्यांमध्ये देखील फारसे काही केले नाही. त्यामुळे भारतीय संघात बदल आवश्यक आहे." BCCI निवडकर्ता म्हणून ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट शोधत आहे. BCCI चे देखील मत आहे की ट्वेंटी-२० क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेला निवडकर्ता निवड समितीचा भाग असावा. निवडकर्त्याचा शोध आतापर्यंत पूर्ण झालेला नाही. अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षण नाईक यांचा समावेश असलेल्या नवीन क्रिकेट सल्लागार समितीला (CAC) संक्षिप्त माहिती स्पष्ट आहे की 'संघाची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून निवडकर्त्यांची निवड करणे'.

नवीन निवड समिती कशी दिसू शकते?

  • व्यंकटेश प्रसाद यांनी दक्षिण विभागातून प्रतिनिधी म्हणून नवीन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे 
  • पश्चिम विभागातून, सलील अंकोलाचे नाव बर्‍याच वेळा आले आहे. बीसीसीआय खजिनदार आशिष शेलार यांचे पाठबळ मिळाल्यास भारताचा माजी वेगवान गोलंदाजाची निवड होऊ शकते  
  • पूर्व विभागातून ओडिशाचे एसएस दास निवडले जाऊ शकतात.
  • उत्तर मधून मनिंदर सिंग, अतुल वासन आणि निखिल चोप्रा हेही स्पर्धेत आहेत
  • नयन मोंगिया हे मध्य विभागातून संभाव्य निवडणुक म्हणून चर्चेत असलेले दुसरे नाव आहे. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :बीसीसीआयआयपीएल २०२२
Open in App