वर्ल्ड कपसाठी गंभीरने निवडला भारतीय संघ; श्रेयस अय्यरसह सॅमसन-चहलला दिला डच्चू

Gautam Gambhir World cup Team : भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने आगामी वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:04 PM2023-09-05T12:04:10+5:302023-09-05T12:04:39+5:30

whatsapp join usJoin us
   Former India player Gautam Gambhir has selected Team India for the odi world cup 2023, excluding Shreyas Iyer, Yuzvendra Chahal and Sanju Samson  | वर्ल्ड कपसाठी गंभीरने निवडला भारतीय संघ; श्रेयस अय्यरसह सॅमसन-चहलला दिला डच्चू

वर्ल्ड कपसाठी गंभीरने निवडला भारतीय संघ; श्रेयस अय्यरसह सॅमसन-चहलला दिला डच्चू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

odi world cup 2023 : भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं आगामी वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी गंभीरनं १५ सदस्यीय संघ निवडला. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आगामी मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जाणकारांसह माजी क्रिकेटपटू आपापली मतं मांडत आहेत. 

सध्या भारतीय संघ आशिया चषक खेळत आहे. अद्याप आगामी वन डे विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा झाली नाही. अशातच गौतम गंभीरनं भारतीय संघ निवडला असून युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसनला संघात स्थान दिलं नाही. गौतम गंभीरनं निवडलेल्या संघाबद्दल भाष्य करायचं झालं तर, माजी डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या संघात अनुभव आणि युवा यांचे मिश्रण ठेवले आहे. मात्र, त्याने श्रेयस अय्यरला संघात स्थान दिले नाही. नेपाळविरुद्धच्या सामन्यात स्टार-स्पोर्ट्ससाठी समालोचन करणाऱ्या गंभीरने आपल्या संघात रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना स्थान दिले.  

गंभीरनं निवडला विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

विश्वचषकातील भारताचे सामने - 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू 

Web Title:    Former India player Gautam Gambhir has selected Team India for the odi world cup 2023, excluding Shreyas Iyer, Yuzvendra Chahal and Sanju Samson 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.