odi world cup 2023 : भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं आगामी वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी गंभीरनं १५ सदस्यीय संघ निवडला. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आगामी मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जाणकारांसह माजी क्रिकेटपटू आपापली मतं मांडत आहेत.
सध्या भारतीय संघ आशिया चषक खेळत आहे. अद्याप आगामी वन डे विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा झाली नाही. अशातच गौतम गंभीरनं भारतीय संघ निवडला असून युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसनला संघात स्थान दिलं नाही. गौतम गंभीरनं निवडलेल्या संघाबद्दल भाष्य करायचं झालं तर, माजी डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या संघात अनुभव आणि युवा यांचे मिश्रण ठेवले आहे. मात्र, त्याने श्रेयस अय्यरला संघात स्थान दिले नाही. नेपाळविरुद्धच्या सामन्यात स्टार-स्पोर्ट्ससाठी समालोचन करणाऱ्या गंभीरने आपल्या संघात रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना स्थान दिले.
गंभीरनं निवडला विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू