नवी दिल्ली : भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य आणि माजी खेळाडू युवराज सिंगने (Yuvraj Singh) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर (Sachin Tendulkar) कौतुकाचा वर्षाव केला आहे. युवराजच्या म्हणण्यानुसार, सचिनने त्याला क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर वैयक्तिक जीवनात देखील खूप मदत केली आहे. तसेच माझ्यासाठी सचिन केवळ आदर्श नसून माझ्या जीवनाचा संकटमोचक देखील आहे, असे युवराज सिंगने म्हटले आहे.
भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये युवराज सिंगची गणना केली जाते. ट्वेंटी-२० विश्वचषक 2007 आणि वन डे विश्वचषक २०११ मध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यात युवराज सिंगने मोलाची भूमिका बजावली होती. युवराज सिंगने सचिन तेंडुलकरसोबत मोठ्या कालावधीपर्यंत क्रिकेट खेळले आहे.
युवराजकडून प्रेमाचा वर्षाव
सचिन आणि आपल्या नात्याबद्दल सांगताना युवराजने पीटीआयशी बोलताना म्हटले, "जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचो, तेव्हा आमच्याकडे प्रशिक्षक असायचे, पण माझ्या बॅटमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या तर सचिन यावर मार्ग काढायचा. तो मला माझ्या समस्यांवर उपाय सांगायचा आणि तो केवळ माझ्यासाठी क्रिकेटमधला आदर्श नव्हता. तर त्याने क्रिकेटच्या जगाबाहेर देखील माझी खूप मदत केली आहे."
"२२ यार्डच्या बाहेर देखील सचिन माझ्यासाठी देवदूतासारखा होता. माझ्या आयुष्यात कोणतीही वैयक्तिक समस्या आल्यावर मी ज्यांना कॉल करायचो त्यापैकी एक म्हणजे सचिन पाजी होते. मी त्यांच्याकडून नेहमीच जीवनात काही महत्त्वाचे सल्ले घेतले आहेत", असे युवराज सिंगने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Former India player Yuvraj Singh says Sachin Tendulkar is not only cricket's role model but also his biggest troublemaker
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.