जगभरातील कोरोना रुग्णांची संख्य 1 कोटी 26 लाख 31,866 इतकी झाली आहे. त्यापैली 73 लाख 67,593 रुग्ण बरे झाले असून 5 लाख 62,921 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 22,674 इतकी झाली असून त्यापैकी 5 लाख 16,308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22,152 रुणांना प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला याच्या पत्नीला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय"
स्मिता सन्याल शुक्ला या पश्चिम बंगालच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या उपसचिव आहेत आणि त्यांचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यांना ताप आला होता आणि आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार त्या घरीच आयसोलेट झाल्या होत्या.'' हो माझी पत्नी स्मिता कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे,''असे लक्ष्मी रतन शुक्लानं सांगितले.
तो पुढे म्हणाला,''तिला हलका ताप जाणवत होता आणि त्यावर ती औषधही घेत होते. तिच्यासह मी, माझी दोन मुलं आणि माझे वडिल घरातच क्वारंटाईन झालो आहोत. आम्ही सर्वांनी गुरुवारी कोरोना चाचणी करून घेतली.'' बंगालच्या रणजी संघाचा कर्णधार असलेल्या लक्ष्मी रतन शुक्लानं 3 वन डे सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आणि त्यात त्यानं 18 धावा व 1 विकेट घेतली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!
पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!
दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?
भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!
कोरोना व्हायरसच्या संकटात सुरेश रैना अन् रिषभ पंतची धम्माल मस्ती; Video Viral
Bad News : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचे निधन; क्रीडा विश्वातून हळहळ