Join us  

मोठी बातमी : भारताचा माजी कर्णधार अफगाणिस्तानला World Cup 2023मध्ये मार्गदर्शन करणार

ICC Cricket World Cup 2023 - भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 3:52 PM

Open in App

ICC Cricket World Cup 2023 - भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. ५ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होतेय आणि भारतीय खेळपट्टींवर अफगाणिस्ताचा संघ दबदबा गाजवेल असे अनेकांचे मत आहेत. मोहम्मद नबी, राशीद खान आणि मुजीब-उर-रहमान अशी जबरदस्त फिरकीपटूंचे त्रिकुट अफगाणिस्तानकडे आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा प्रत्येक सामना हा पाहण्यासारखा असेल, त्यात त्यांना आणखी बळ मिळाले आहे. भारताच माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील फलंदाज अजय जडेजा ( Ajay Jadeja) याची अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या मेंटॉर ( मार्गदर्शक) म्हणून निवड केली गेली आहे.

अफगाणिस्तान ७ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्धच्या लढतीने वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला यजमान भारताविरुद्ध ते दिल्लीत खेळतील. अजय जडेजाची मेंटॉर म्हणून नियुक्ती अफगाणिस्ताच्या फायद्याची ठरू शकते. अजयकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहेच, शिवाय त्याला भारतीय खेळपट्ट्यांची चांगली माहिती आहे.

अजयने १९९२ ते २००० या कालावधीत १५ कसोटी सामन्यांत ५७६ धावा केल्या आहेत आणि ९६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. शिवाय त्याने १९६ वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यात ३७.४७च्या सरासरीने ५३५९ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं व ३० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्याकडे १११ प्रथम श्रेणी आणि २९१ लिस्ट ए क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याच्या नावावर एकूण ८०००+ धावा, ३१ शतकं व ८८ अर्धशतकं आहेत.   अफगाणिस्तानचा संघ - हशमतुल्लाह शाहिदी ( कर्णधार), रहमनुल्लाह गुर्बाझ, इब्राहिम झाद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजिबुल्लाह झाद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलिखिल, अझमतुल्लाह ओमारझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तान