डान्स पे डान्स...! अनुष्का शर्माकडून विराटला नृत्याचे धडे; कोहलीची स्टेप चुकली अन्...

virat kohli and anushka sharma : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 01:01 PM2023-04-24T13:01:37+5:302023-04-24T13:02:26+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian captain and current captain of Royal Challengers Bangalore in ipl Virat Kohli and Bollywood actress Anushka Sharma danced, watch video | डान्स पे डान्स...! अनुष्का शर्माकडून विराटला नृत्याचे धडे; कोहलीची स्टेप चुकली अन्...

डान्स पे डान्स...! अनुष्का शर्माकडून विराटला नृत्याचे धडे; कोहलीची स्टेप चुकली अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

virat kohli dance । मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये (IPL 2023) व्यस्त आहे. विराट मागील दोन सामन्यांपासून रॉयल चॅलेंजर्सं बंगळुचे (RCB) कर्णधारपद भूषवत आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीने दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत भरारी घेतली आहे. काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला नमवून विराटच्या संघाने घरच्या मैदानावार ७ धावांनी विजय मिळवला. विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. दोघेही नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. 

दरम्यान, आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा संयुक्त नृत्य करत असल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का शर्मा किंग कोहलीला नृत्याचे धडे देत असल्याचे पाहायला मिळते. सुरूवातीला विराटही अनुष्कासोबत गाण्याच्या चालीनुसार ठेका धरतो पण अखेरीस कोहलीकडून एक स्टेप चुकते अन् अनुष्काला हशा पिकतो. अनुष्काने व्हिडीओ पोस्ट करताच चाहत्यांकडून कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव होत आहे. 

विराटच्या नेतृत्वात RCB सुसाट
आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीच्या संघाने ७ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. मागील दोन सामन्यात विराटच्या नेतृत्वात आरसीबी मैदानात होती. दोन्हीही सामन्यात विजय मिळवून विराटने संघाला विजयाच्या पटरीवर आणले आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीने प्रथम पंजाब किंग्जला नंतर राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. काल झालेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ बाद १८९ धावा केल्या. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने कडवी झुंज दिली पण विराटच्या संघाने घरच्या मैदानावर विजय मिळवून चाहत्यांना खुश केले. अखेर राजस्थानचा संघ २० षटकांत ६ बाद १८२ धावा करू शकला आणि आरसीबीने ७ धावांनी सामना आपल्या नावावर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Former Indian captain and current captain of Royal Challengers Bangalore in ipl Virat Kohli and Bollywood actress Anushka Sharma danced, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.