धोनी पोहोचला रांचीच्या ७०० वर्ष जुन्या मंदिरात; माही येताच चाहत्यांची उसळली गर्दी

महेंद्रसिंग धोनीने आयपीएलची तयारी सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:36 PM2024-02-06T19:36:45+5:302024-02-06T19:38:08+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian cricket team captain MS Dhoni visited Ranchi's 700-year-old temple | धोनी पोहोचला रांचीच्या ७०० वर्ष जुन्या मंदिरात; माही येताच चाहत्यांची उसळली गर्दी

धोनी पोहोचला रांचीच्या ७०० वर्ष जुन्या मंदिरात; माही येताच चाहत्यांची उसळली गर्दी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलची तयारी सुरू केली आहे. धोनी आयपीएलच्या आगामी हंगामाच्या तयारीला लागला असून पुन्हा एकदा चेन्नईच्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी माही सज्ज आहे. २०२४ मध्ये धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

मागील वर्षी धोनीला गुडघ्याच्या समस्येने त्रस्त केले होते. असे असताना देखील धोनीने मागील वर्षी आयपीएलच्या सर्व सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले. असे मानले जात होते की महेंद्रसिंग धोनी २०२३ च्या अखेरीस आयपीएलमधून निवृत्त होईल. पण त्याने आयपीएल २०२४ खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मागील आयपीएल हंगामाच्या समाप्तीनंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाली.

माही येताच चाहत्यांची उसळली गर्दी  
आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी त्याच्या मूळ गावी रांचीजवळील देवरी मंदिरात पोहोचला. धोनीची या मंदिरातील देवीवर विशेष श्रद्धा आहे. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तो अनेकदा मंदिरात जातो. माँ देवरी मंदिराचे एक वेगळे महत्त्व आहे. देवरी मंदिरात देश-विदेशातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

माहितीनुसार हे मंदिर ७०० वर्षे जुने आहे. माँ देवरी मंदिरात सुमारे साडेतीन फूट उंचीची १६ हात असलेली काली देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या बांधकामाबद्दल असे म्हटले जाते की, हे मंदिर दहाव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले होते. महेंद्रसिंग धोनी अनेकदा या मंदिरात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो.  

Web Title: Former Indian cricket team captain MS Dhoni visited Ranchi's 700-year-old temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.