निवृत्त खेळाडूंसाठी पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (LLC) भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आयुक्त म्हणून सामील करण्यात आले आहे. एलएलसीच्या पहिल्या सीझनचे आयोजन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात एखाद्या आखाती देशात करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे शास्त्री म्हणाले, "क्रिकेटशी, विशेषत: चॅम्पियन राहिलेल्या आपल्या दिग्गजांशी निगडीत असणे अत्यंत छान वाटते."
शास्त्री म्हणाले, ''हे अत्यंत मजेदार असणार आहे. या दिग्गजांना पुन्हा काहीही सिद्ध करायचे नाही, पण त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. त्यामुळे ते याला कसा न्याय देतात, हे पाहणे अत्यंत मजेशीर असणार आहे." मात्र, सध्या आयुक्त म्हणून त्यांची भूमिका नेमकी कशी असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावेळी, मी लिजेंड्स लीग क्रिकेटचा एक भाग झाल्याने अत्यंत आनंदी आहे, असेही शास्त्री यावेळी म्हणाले.
शास्त्री म्हणाले, ''हा एक अनोखा उपक्रम आहे आणि अम्हाला याचे भविष्य उज्वल असल्याचे दिसत आहे. लीगमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटर्स असतील. यात ते भारत, आशिया आणि उर्वरित जगातील संघाचे प्रतिनिधित्व करतील. भारतीय संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट अँड्र्यू लीपस यासोबत निदेशक (खेळ विज्ञान) म्हणून जोडले जातील. ते खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवतील.
Web Title: Former indian cricket team head coach Ravi Shastri joins upcoming legends league as commissioner
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.