Join us  

Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!

Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका वृत्तानुसार, विराटची संपत्ती १,००० कोटी आहे पण जाडेजा त्यापुढे निघून गेलाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 6:55 PM

Open in App

Ajay Jadeja Net worth overtakes Virat Kohli: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली हा मैदानातच नव्हे तर मैदानाबाहेरही खूप लोकप्रिय आहे. विराटचे फॅन्स आणि सोशल मीडिया फॉलोअर्स संपूर्ण जगभरात पसरलेले आहेत. विराट कोहली हा केवळ एक व्यक्ती नसून एक मोठा ब्रँड आहे. विराट अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करतो. त्यामुळे विराटची संपत्तीदेखील सध्याच्या आणि आजी-माजी क्रिकेटपटूंपेक्षा खूप जास्त आहे. एका वृत्तानुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती ही २०२४मध्ये सुमारे १,००० कोटी इतकी आहे. फलंदाजीसोबतच विराट कोहलीच्या संपत्तीशी स्पर्धा करणेही इतर भारतीय क्रिकेटपटूंसाठी खूप कठीण आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा याने अवघ्या एका दिवसात विराट कोहलीला संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. ११ ऑक्टोबरच्या दिवशी अजय जाडेजाच्या आयुष्यात हा चमत्कार घडला.

एका दिवसांत काय चमत्कार घडला?

शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४चा दिवस हा अजय जाडेजासाठी खूप खास दिवस होता. काल ​​जामनगरच्या राजघराण्यातील शत्रुशल्य सिंह जी महाराज यांनी त्यांच्या राजघराण्याचा पुढील उत्तराधिकारी म्हणून अजय जाडेजा याचे नाव घोषित केले. अजय जाडेजा हा जामनगरचा वारस बनल्यानंतर तो किती मालमत्तेचा मालक बनला हे जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. जामनगरचा उत्तराधिकारी घोषित झाल्यानंतर अजय जाडेजाची एकूण संपत्ती ही सुमारे १,४५५ कोटींच्या पुढे गेली आहे. वनइंडियाच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीची सध्याची संपत्ती १,००० कोटी रुपये आहे. पण अजय जाडेजा अचानक एका दिवसा त्याच्या खूप पुढे निघून गेला.

अजय जाडेजाला एवढी सारी संपत्ती वडिलोपार्जित मालमत्तेच्या रुपात मिळाली. अजय जडेजा केएस रणजितसिंहजी आणि केएस दुलीपसिंहजी यांच्या वंशातील आहे. अजय जाडेजाचे वडील दौलतसिंह जाडेजा आणि आई ग्यानबा जाडेजा यांनी शाही मानमरातब योग्य रितीने जपला. आता अजय जाडेजाला या घरण्याचा वारसदार केल्याने त्याच्याकडे संपत्ती आलेली असली तरी त्यासोबत मोठी जबाबदारीही आलेली आहे.

दरम्यान, अजय जाडेजाने भारतीय संघासाठी एकूण १५ कसोटी आणि १९६ एकदिवसीय सामने खेळले. त्याने २४ कसोटी डावांत २६च्या सरासरीने ५७६ धावा केल्या. तर वनडेमध्ये १७९ डावांमध्ये ३७च्या सरासरीने ५,३५९ धावा काढल्या. जाडेजाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतके आणि ३४ अर्धशतके आहेत.

टॅग्स :विराट कोहलीजामनगरगुजरातभारतीय क्रिकेट संघ