Join us  

भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल ६६ व्या वर्षी दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर, २८ वर्षांनी लहान तरुणीसोबत करणार विवाह 

Arun Lal Marriage: भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. ते वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरा विवाह करणार आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव बुलबुल आहे. तिचं वय ३८ वर्षे असून, ती अरुण लालपेक्षा २८ वर्षांनी लहान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 3:59 PM

Open in App

कोलकाता - भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. ते वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरा विवाह करणार आहे. त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव बुलबुल आहे. तिचं वय ३८ वर्षे असून, ती अरुण लालपेक्षा २८ वर्षांनी लहान आहे.

अरुण लाल आणि बुलबुल हे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत ओळखत आहेत. तसेच दोघेही एकमेकांचे जुने मित्र आहेत. अरुण लाल यांनी विवाहाच्या पत्रिका छापल्या असून, त्यांचे वाटप सुरू झाले आहे. त्यांचा विवाह २ मे रोजी कोलकाता येईल पीयरलेस इन हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नानंतर मोठा स्वागत समारंभही होणार आहे.

अरुण लाल यांनी पहिला विवाह रीना यांच्याशी केला होता. आता त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रीना खूप दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्या मर्जीनेच अरुण लाल हे दुसरा विवाव करत आहेत. अरुण लाल आणि बुलबुल यांनी महिनाभरापूर्वी साखरपुडा केला होता. मात्र ते खूप आधीपासून नात्यामध्ये होते.

अरुण लाल यांचा जन्म हा १९५५ मध्ये उत्तर प्रदेशात झाला होता. मात्र ते बंगालकडून क्रिकेट खेळले. आता त्यांच्या विवाह सोहळ्यात बंगाल क्रिकेटचे अधिकारी, सहकारी क्रिकेटपटू आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, २०१६ च्या सुमारास अरुण लाल यांना कर्करोग झाला होता. त्यामुळे त्यांना समालोचनाचं काम सोडावं लागलं होतं. मात्र नंतर ते कर्करोगातून मुक्त झाले आणि त्यांनी बंगाल क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली.

अरुण लाल यांना आपल्या छोट्याशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १६ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळले होते. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १५६ सामने खेळताना ३० शतके फटकावली. तसेच १० हजार ४२१ धावा जमवल्या. त्यांनी आपला पहिला एकदिवसीय सामना २७ जानेवारी १९८२ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तर १९८९ मध्ये वेस्ट इंडियविरुद्धची किंग्स्टन कसोटी त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरली.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसेलिब्रिटीलग्न
Open in App