ते मला मुलगा मानायचे, त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयात कायम; बिशन सिंग यांच्या आठवणीत सचिन भावूक

Bishan Singh Bedi passes away : भारताचे माजी खेळाडू महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 07:19 PM2023-10-23T19:19:41+5:302023-10-23T19:19:59+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian cricketer Bishan Singh Bedi has died at the age of 77 and Sachin Tendulkar shared an emotional post sharing his memories with him  | ते मला मुलगा मानायचे, त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयात कायम; बिशन सिंग यांच्या आठवणीत सचिन भावूक

ते मला मुलगा मानायचे, त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयात कायम; बिशन सिंग यांच्या आठवणीत सचिन भावूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

bishan singh bedi death : आपल्या फिरकीने भल्याभल्यांना घाम फोडणारे भारताचे माजी खेळाडू महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय सामन्यांद्वारे चाहत्यांना क्रिकेटचा आनंद दिला. १९६७ ते १९७९ या कालावधीत त्यांनी भारताचे ६७ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि २६६ बळी घेतले. १० वन डे सामन्यांत त्यांच्या नावावर ७ बळींची नोंद आहे. बेदी एक उत्तम डावखुरे फिरकीपटू तसेच उत्तम कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ४०० धावांचे आव्हान पार केले होते आणि १९७७-७८ मध्ये बेदींच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने जिंकले, मात्र ऑस्ट्रेलियाने ती मालिका ३-२ ने आपल्या नावावर केली होती. भारतीय क्रिकेटचा दिग्गज काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी बेदी यांना विविध माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील खास चारोळ्या लिहित दिग्गजांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 

सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "साशू, ते मला या नावाने प्रेमाने हाक मारत... बिशन पाजींसाठी मी क्रिकेटर नसून त्यांचा मुलगाच होतो. त्यांच्यासाठी मी मुलासारखा होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इंग्लंडमध्ये माझी पहिली शतकी खेळी केली. न्यूझीलंडमध्ये थंडगार संध्याकाळी आम्ही जेवायला बसायचो आणि मी त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट, त्यांनी शेअर केलेल्या शहाणपणाच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचो. जिथे नेहमी त्यांचा आवाज असायचा तिथे शांतता पसरली आहे. पाजी, तुमच्याशिवाय जग थोडे रिकामे वाटते. आता शांततेत विश्रांती घ्या, ज्यासाठी आपण पात्र आहात." 

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी प्रथम उत्तर पंजाबसाठी खेळले, जेव्हा ते फक्त पंधरा वर्षांचे होते आणि १९६८-६९ मध्ये ते दिल्लीला गेले आणि १९७४-७५च्या रणजी करंडक स्पर्धा त्यांनी गाजवलीव ६४ बळी घेतले. बेदी यांनी अनेक वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६० विकेट्ससह आपली कारकीर्द पूर्ण केली.   

बिशन बेदी यांचे भारतासाठी योगदान - 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९६९-७० : २०.५७ च्या सरासरीने २१ बळी
भारत विरुद्ध इंग्लंड १९७२-७३: २५.२८ च्या सरासरीने २५ बळी 
वेस्ट इंडिजमध्ये १९७५-१९७६  : २५.३३ च्या सरासरीने १८ बळी 
भारत विरूद्ध न्यूझीलंड १९७६–७७: १३.१८च्या सरासरीने २२ बळी
भारत विरुद्ध इंग्लंड १९७६–७७ : २२.९६ च्या सरासरीने २५ बळी 
ऑस्ट्रेलियामध्ये १९७७–७८ : २३.८७ च्या सरासरीने ३१ बळी 
 

Web Title: Former Indian cricketer Bishan Singh Bedi has died at the age of 77 and Sachin Tendulkar shared an emotional post sharing his memories with him 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.