BREAKING : भारताच्या माजी गोलंदाजाची आत्महत्या? राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्यासोबत गाजवलेले मैदान 

भारतीय क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:37 PM2024-06-20T15:37:11+5:302024-06-20T15:37:32+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian cricketer David Johnson was found dead outside his apartment on Thursday, police said | BREAKING : भारताच्या माजी गोलंदाजाची आत्महत्या? राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्यासोबत गाजवलेले मैदान 

BREAKING : भारताच्या माजी गोलंदाजाची आत्महत्या? राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्यासोबत गाजवलेले मैदान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन (David Johnson ) याच्या संशयास्पद मृत्यूचे वृत्त समोर येत आहे. जॉन्सनचा त्याच्या चौथ्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला असून ही आत्महत्या आहे की नाही याचा तपास सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.  सध्या उपलब्ध असलेल्या तपशीलांनुसार, जॉन्सन, त्याच्या घराजवळ क्रिकेट अकादमी चालवत होता आणि अलीकडच्या काळात त्याची तब्येत बरी नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळणारा जॉन्सन डिप्रेशनमध्ये होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोककळा पसरली. चाहते त्याला श्रद्धांजली वाहतात. जॉन्सनने भारतासाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांच्यासोबत कसोटी सामने खेळले आहेत.


डेव्हिड जॉन्सनने टीम इंडियासाठी २ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने ८ धावा केल्या आणि ३ बळी घेतले. जॉन्सनने ३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३७ धावा केल्या आणि १२५ विकेट घेतल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३३ सामन्यांमध्ये त्याने ११८ धावा केल्या आणि ४१ विकेट्स घेतल्या.



BCCI चे सचिव जय शाह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

डेव्हिड जॉन्सनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश केला. त्याने १९९५-९६ च्या रणजी करंडक स्पर्धेत केरळविरुद्ध १५२ धावांत १० बळी अशी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली होती. यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली आणि  त्याने १९९६ मध्ये फिरोजशाह कोटला येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. तेव्हा श्रीनाथला दुखापतीमुळे या मालिकेत खेळता आले नव्हते आणि जॉन्सनला संधी मिळाली. त्याने त्याचा कर्नाटक संघाचा सहकारी व्यंकटेश प्रसादच्या साथीने गोलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात मायकेल स्लेटरची विकेट घेतली. त्यानंतर जॉन्सन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला, पण त्याला पहिल्याच कसोटीत खेळायला मिळाले. त्याने गिब्स आणि मॅकमिलनच्या विकेट्स घेतली.  

Web Title: Former Indian cricketer David Johnson was found dead outside his apartment on Thursday, police said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.