जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 24 लाख 81,866 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 70,455 जणांना प्राण गमवावे लागले, तर 6 लाख 51,542 जणं बरी झाली आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 18,658 इतकी झाली आहे. आतापर्यंत 592 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3273 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांचा बरं करण्यासाठी अनेक डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक दिवसरात्र काम करत आहेत. या डॉक्टर्समध्ये एक भारताच्या क्रिकेटपटूचे वडिलही आहेत.
दिल्ली रणजी संघाचा माजी कर्णधार मिथून मन्हास याचे वडील डॉक्टर आहेत आणि ते आपले कर्तव्य बजावत आहेत. मिथूननं रविवारी त्याच्या वडिलांसोबतचा व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केला. त्यावर त्यानं लिहीलं की,''माझे वडील 77 वर्षांचे आहेत. तरीही ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. आम्हाला तुमचा अभिमान आहे.''
मिथुन मन्हास जम्मूत राहणारा आहे. त्याने अनेक वर्ष दिल्लीच्या रणजी संघाचे नेतृत्व सांभाळले. 2016मध्ये त्याने अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 45.82च्या सरासरीनं 9714 धावा केल्या आहेत आणि त्यात 27 शतकं व 49 अर्धशतकांचा समावेश आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार
चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे
फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यु
10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा
Web Title: former indian cricketer mithun manhas doctor father taking care patients in coronavirus pandemic svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.