नवी दिल्ली : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटची ( (IISM) स्थापना करणारे भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांना क्रीडा शिक्षणातील अग्रगण्य कार्यासाठी २०२० सालचा 'राष्ट्रीय खेल प्रोत्साहन' पुरस्काराने प्रदान करण्यात आला. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कात प्रदान करण्यात आला. क्रीडा संवर्धन आणि विकासात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्थेला हा पुरस्कार मिळाला.
कुलकर्णी म्हणाले, “इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटला क्रीडा व्यवस्थापनातील योगदानासाठी मान्यता मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. भारतातील क्रीडा व्यवस्थापनातील आमचा पहिलाच उपक्रम लोकप्रिय होत आहे. आमच्या अद्भुत प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग असल्याबद्दल मी आमचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक आणि सहयोगी यांचे आभार मानू इच्छितो. शिवाय क्रीडा उद्योगात काहीतरी नवीन करण्याच्या आमच्या कष्टाळू प्रयत्नांना भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि खेलो इंडियाकडून सतत मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल मी कौतुक करतो आणि त्यासाठी कृतज्ञ आहे.”