Join us

संजय बांगरचा मुलगा लंडनमध्ये झाली मुलगी 'अनया'! मुलगा असताना असं होतं क्रिकेटचं रेकॉर्ड

Anaya Bangar Aryan Bangar Cricket Record Sanjay Bangar: अनया बांगर आधी आर्यन बांगर होता, त्याने मुंबईत क्रिकेट खेळले आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:35 IST

Open in App

Anaya Bangar Aryan Bangar Cricket Record Sanjay Bangar: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय बांगर एक उत्तम खेळाडू होते. त्यांनी केवळ देशांतर्गतच नव्हे तर टीम इंडियाचेही प्रतिनिधित्व करत आपली छाप उमटवली. सध्या त्यांचे नाव एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत आहे. त्यांचा मुलगा आर्यन बांगर, जो आता लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी झाला आहे. आता तिची ओळख अनया बांगर अशी आहे. पण तो जेव्हा मुलगा होता, त्यावेळी तोदेखील वडीलांप्रमाणेच क्रिकेट खेळत असे. जेव्हा तो आर्यन बांगर होता, तेव्हा त्याने अनेक क्लब क्रिकेट सामने खेळले असून त्यात त्याच्या नावे काही मोठे विक्रमही आहेत.

२८ षटकार-चौकारांसह २६० धावा

जेव्हा तो आर्यन बांगर म्हणून क्रिकेट खेळायचा तेव्हा त्याने क्लब क्रिकेट स्तरावर एकूण १५ सामने खेळले होते. त्यामध्ये त्याने एकूण २४ चौकार आणि ४ षटकारांसह २६० धावा केल्या होत्या. याशिवाय आर्यन बांगरने गोलंदाजी करत ५ विकेट्सही घेतल्या होत्या. आर्यन बांगरच्या क्लब लेव्हल १५ सामन्यांपैकी ९ सामने एकदिवसीय सामने होते. त्याने ५ टी२० सामने आणि १ चारदिवसीय सामना खेळला. आर्यन बांगरने ९ एकदिवसीय सामन्यांच्या ८ डावात एका अर्धशतकासह २०८ धावा केल्या. या काळात त्याने दोनदा २५ पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला. एकदिवसीय सामन्यात आर्यनने एकूण २१ चौकार आणि ४ षटकार मारले. गोलंदाजीत त्याने क्लब लेव्हल वनडे सामन्यांत पाचही विकेट्स घेतल्या आहेत.

आर्यनच्या क्लब लेव्हल टी२० सामन्यांमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ५ सामन्यांच्या ५ डावात ३२ धावा केल्या. त्याने टी२० मध्ये एका डावात गोलंदाजी केली, पण त्याला एकही विकेट मिळालेली नाही. आर्यन बांगरने खेळलेल्या एकमेव चारदिवसीय सामन्यात २० धावा केल्या. आर्यनने या फॉरमॅटमध्ये गोलंदाजी केलेली नाही. आता आर्यन शस्त्रक्रिया करून अनया झाली आहे, त्यापुढचे तिचे प्लॅन काय आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही.

इंग्लंडमध्ये झालं हार्मोन ट्रान्सप्लांट, आर्यन झाला अनया

इंग्लंडमध्ये हार्मोन प्रत्यारोपणानंतर आर्यन बांगर मुलगी झाली. तिने तिचे नावही बदलून अनया बांगर असे ठेवले. अलिकडेच अनया बांगर इंग्लंडहून भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर अनाया सोशल मीडियावर बरीच सक्रिय दिसते.

टॅग्स :ट्रान्सजेंडरऑफ द फिल्ड