Suresh Raina in Gujarat Titans : मोठी बातमी, सुरेश रैना गुजरात टायटन्सकडून IPL 2022त खेळणार?; समोर आले मोठे अपडेट्स

Suresh Raina in Gujarat Titans : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने माघार घेतल्यानंतर गुजरात टायसन्सनला ( Gujarat Titans) मोठा धक्का बसला. दोन कोटी मूळ किंमत असलेल्या रॉयच्या माघारीनंतर सुरेश रैनाच्या ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:57 PM2022-03-03T12:57:06+5:302022-03-03T12:59:49+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian cricketer Suresh Raina not even in consideration for Gujarat Titans in IPL 2022: Sources | Suresh Raina in Gujarat Titans : मोठी बातमी, सुरेश रैना गुजरात टायटन्सकडून IPL 2022त खेळणार?; समोर आले मोठे अपडेट्स

Suresh Raina in Gujarat Titans : मोठी बातमी, सुरेश रैना गुजरात टायटन्सकडून IPL 2022त खेळणार?; समोर आले मोठे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suresh Raina in Gujarat Titans : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) ताफ्यात घेण्यास कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये Mr. IPL रैना अनसोल्ड राहिला. त्यानंतर सुरेश रैनाची आयपीएल कारकीर्द संपुष्टात आली अशी चर्चा सुरू झाली. पण, इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने माघार घेतल्यानंतर गुजरात टायसन्सनला ( Gujarat Titans) मोठा धक्का बसला. दोन कोटी मूळ किंमत असलेल्या रॉयच्या माघारीनंतर सुरेश रैनाच्या ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला. गुजरातने रॉयच्या जागी रैनाला संघात घ्यावे अशी मागणी होत आहे. त्यादृष्टीने महत्त्वाचे अपडेट्स आता समोर आले आहेत.

जेसन रॉय काय म्हणाला?

गुजरात टायटन्सचे चाहते आणि सहकारी यांना हाय... मला मनावर दगड ठेऊन हे सांगावे लागतेय की मी यंदाच्या आयपीएलमधून माघार घेत आहे. मला संघ व्यवस्थापनाचे आणि कर्णधार हार्दिक पांड्याचे आभार मानायचे आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मागील तीन वर्ष खूप दगदगीचे गेले आणि आता मला स्वतःला पुरेसा वेळ द्यायचा आहे. आगामी स्पर्धांचं व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता मला विश्रांतीची गरज आहे.''

रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रैना चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली ( ६२८३), रोहित शर्मा ( ५७८४) व शिखर धवन (५६११) हे आघाडीवर आहेत.  

बायो बबलच्या थकव्यामुळे रॉयने आयपीएलमध्ये माघार घेतली. आता गुजरात टायटन्स रॉयची रिप्लेसमेंट शोधण्यास सुरुवात करत असताना फ्रँचायझीच्या ताफ्यातून महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत. Timesnow ला सूत्रांनी सांगितले की, ''सुरेश रैना गुजरात टायटन्सच्या ताफ्यात येत नाहीय. रॉयच्या रिप्लेसमेंटसाठी त्याच्या नावाचा विचारही केलेला नाही.''

Web Title: Former Indian cricketer Suresh Raina not even in consideration for Gujarat Titans in IPL 2022: Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.