नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने देशाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. सुरेश रैनाने एकट्याने संपूर्ण सामना उलथवून टाकल्याचे अनेक प्रसंग पाहायला मिळतात. 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, तेव्हा त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच निवृत्तीची घोषणा केली होती.
दरम्यान, त्या दिवसाची गोष्ट शेअर करताना सुरेश रैनाने एक मोठे विधान केले आहे. "माझी आणि महेंद्रसिंग धोनीची कहाणी सारखीच आहे, मी गाझियाबादसारख्या छोट्या शहरातून आलो होतो आणि एमएस धोनी देखील रांचीमधून आला होता. मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे."
सुरेश रैनांचे मोठे विधान सुरेश रैनाने सांगितले की, "मी महेंदसिंग धोनीसाठी खेळलो आणि नंतर देशासाठी खेळलो, तो एक महान खेळाडू आणि एक अद्भुत व्यक्ती आहे. माझा त्याच्याशी खास संबंध आहे." लक्षणीय बाब म्हणजे 15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7.29 वाजता महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. एमएस धोनीच्या घोषणेनंतर काही वेळातच सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. सुरेश रैनाने भारतासाठी 226 वन डे सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 5 शतके आणि 5615 धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने 18 कसोटी सामने देखील खेळले, ज्यात त्याने एका शतकासह 768 धावा केल्या. तर 78 ट्वेंटी-20 सामन्यात रैनाच्या नावार 1604 धावांची नोंद आहे. तसेच सुरेश रैनाने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"