Join us  

वीरेंद्र सेहवागने BCCIच्या सूत्रांना शाब्दीक फटके मारले; ते वृत्त फेटाळले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) टीम इंडियाच्या निवड समितीसाठी गुरुवारी अर्ज मागवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 1:57 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) टीम इंडियाच्या निवड समितीसाठी गुरुवारी अर्ज मागवले. निवड समिती प्रमुखपदासाठी वीरेंद्र सेहवागला विचारणा केली होती, असे वृत्त बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देऊन प्रसिद्ध करण्यात आले होते. पण, भारताचा माजी सलामीवीर सेहवागने हे वृत्त फेटाळून लावले अन् बीसीसीआयकडून कुणीच निवड समिती प्रमुख बनण्याची विचारणा केली नसल्याचे स्पष्ट केले.  

फेब्रुवारीमध्ये चेतन शर्मा यांना एका स्टिंग ऑपरेशनमुळे निवड समिती प्रमुखपदावरून काढून टाकण्यात आले होते. या स्टींग ऑपरेशनमध्ये त्यांनी भारतीय खेळाडू आणि संघ निवडीबद्दल गुप्त माहितीवर चर्चा केली होती. तेव्हापासून बीसीसीआय  निवड समिती प्रमुखाशिवाय आहे. जेव्हा TOIने सेहवागला अशा ऑफरच्या शक्यतेबद्दल विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले, “नाही.”

चेतन शर्मा यांची हकालपट्टी केल्यापासून, माजी भारतीय खेळाडू शिव सुंदर दास पॅनेलचे अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून काम करत आहेत. बीसीसीआयचे इतर निवडकर्ते एस शरथ (दक्षिणमधून), सुब्रतो बॅनर्जी (केंद्रातून) आणि सलील अंकोला (पश्चिमेकडून) आहेत.  

बीसीसीआयने आता निवड समितीसाठी जाहिरात पोस्ट केली आहे. गुरुवारी, बीसीसीआयने आपल्या वेबसाइटवर पुरुष निवड समितीच्या सदस्यासाठी नोकरीच्या पदाची यादी पोस्ट केली.  निवडलेला उमेदवार कदाचित समितीचा नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यभार स्वीकारेल. अर्जदाराने एकतर ३०  प्रथम श्रेणी सामने, सात कसोटी किंवा १० वन डे सामने आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत. त्याने किमान पाच वर्षांपूर्वी निवृत्ती घेतलेली असायला हवी.  या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. नवीन निवडकर्त्याने "मजबूत बेंच स्ट्रेंथची योजना आखणे आणि तयार करणे" आणि "प्रत्येक फॉरमॅटमध्ये संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे" अशी अपेक्षा केली जाईल. 

 

टॅग्स :विरेंद्र सेहवागबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App