"मी MS Dhoni व व्यवस्थापनाला शाप देतो!" चाहत्याचं ट्विट अन् इरफान पठाणचं एका वाक्यात उत्तर

भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने एका ट्विटने मन जिंकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 05:51 PM2022-09-27T17:51:00+5:302022-09-27T17:51:50+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian Irfan Pathan gives legendary one-line response to fan's 'I curse MS Dhoni...' post   | "मी MS Dhoni व व्यवस्थापनाला शाप देतो!" चाहत्याचं ट्विट अन् इरफान पठाणचं एका वाक्यात उत्तर

"मी MS Dhoni व व्यवस्थापनाला शाप देतो!" चाहत्याचं ट्विट अन् इरफान पठाणचं एका वाक्यात उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने एका ट्विटने मन जिंकले आहे. एका चाहत्याने इरफानची क्रिकेट कारकीर्द संपवण्यात महेंद्रसिंग धोनीचा हात असल्याचे ट्विट केले आणि MS Dhoni व तत्कालीन संघ व्यवस्थापनाला शाप दिला. त्यावर इरफानने एका वाक्यात दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.               

इरफान पठाणने २०१२ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.  त्यानंतर काही महिन्यात श्रीलंकेविरुद्ध त्याने अखेरचा वन डे सामना खेळला.त्या सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. तेव्हा तो २८ वर्षांचा होता.२००८ नंतर तो भारताकडून कसोटीत खेळलेला नव्हता. त्याने २९ कसोटी, १२० वन डे व २४ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे १००, १७३ व २८ विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर कसोटीत शतकही आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारही पटकावला होता.  

सध्या तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळतोय आणि या स्पर्धेतील त्याचा खेळ पाहून चाहत्याने ट्विट केले. '' या लीगमध्ये मी जेव्हा जेव्हा इरफान पठाणला खेळताना पाहतो, तेव्हा मी महेंद्रसिंग धोनी व त्याच्या व्यवस्थापनाला शाप देतो. वयाच्या २९व्या वर्षी त्याने भारतासाठी अखेरचा सामना खेळला, यावर माझा विश्वासच बसत नाही.  सातव्या क्रमांकासाठी तो सक्षम पर्यात होता आणि कोणत्याही संघाने त्याला खेळवले असते, परंतु भारतीय संघ जड्डू व बिन्नी यांना घेऊन खेळला,''असे चाहत्याने ट्विट केले.

crत्यावर इरफानने रिप्लाय दिला. तो म्हणाला, मला कोणालाही दोष द्यायचा नाही... तू दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार.  

Web Title: Former Indian Irfan Pathan gives legendary one-line response to fan's 'I curse MS Dhoni...' post  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.