"मी गुजराती आहे म्हणून GT नं जिंकायला हवं असं वाटतं, पण...", पठाणचा दोन्ही दगडावर हात

gt vs csk, ipl 2023 final : गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात किताबी लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 04:27 PM2023-05-28T16:27:31+5:302023-05-28T16:28:17+5:30

whatsapp join usJoin us
former indian player Irfan Pathan said I want GT to win because I'm a Gujarati But my feelings are inclined towards MS Dhoni | "मी गुजराती आहे म्हणून GT नं जिंकायला हवं असं वाटतं, पण...", पठाणचा दोन्ही दगडावर हात

"मी गुजराती आहे म्हणून GT नं जिंकायला हवं असं वाटतं, पण...", पठाणचा दोन्ही दगडावर हात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : जगातील सर्वात मोठ्या ट्वेंटी-२० लीगला अर्थात आयपीएलला आज सोळावा चॅम्पियन मिळणार आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात किताबी लढत होत आहे. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने गतविजेत्यांना क्वालिफायर १ मध्ये पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली, तर गुजरातने पाचवेळच्या चॅम्पियन मुंबईचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा किताब जिंकण्याच्या इराद्याने फायनलमध्ये प्रवेळ मिळवला.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने मागील वर्षी आपल्या पदार्पणाच्या हंगामातच किताब पटकावला होता. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी हार्दिकसेना ही किमया साधणार का हे पाहण्याजोगे असेल. अशातच भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले.

पठाणचा दोन्ही दगडावर हात
"मी गुजराती असल्यामुळे फायनलचा सामना गुजरात टायटन्सने जिंकावा असं वाटतं. पण माझ्या भावना महेंद्रसिंग धोनीकडेही झुकल्या आहेत. ट्रॉफी जिंकण्यासाठी माझे हृदय CSK ​​च्या पाठीशी आहे", असं पठाणनं म्हटले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडत आहे.

मोठा ट्विस्ट! WTC फायनलसाठी जैस्वाल इंग्लंडला जाणार; ऋतुराज गायकवाडची माघार, जाणून घ्या कारण

CSK ला पाचव्या तर GT ला दुसऱ्या ट्रॉफीची प्रतीक्षा
आजचा सामना जिंकून पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न धोनीच्या चेन्नईचा असेल. तर सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावून इतिहास रचण्याची संधी गुजरातला असेल. चेन्नईने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये आयपीएलचा किताब जिंकला आहे. चारवेळा ट्रॉफी जिंकणारा चेन्नईचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

 

Web Title: former indian player Irfan Pathan said I want GT to win because I'm a Gujarati But my feelings are inclined towards MS Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.