Join us  

"रोहित शर्माने IPL मधून माघार घ्यायला हवी", सुनिल गावस्करांचा हिटमॅनला 'मोलाचा' सल्ला

wtc final squad india 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:15 PM

Open in App

rohit sharma ipl । नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर (sunil gavaskar) यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला आयपीएलमधून माघार घेण्याचा सल्ला दिला आहे. आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्यासाठी हिटमॅन (rohit sharma test) तंदुरूस्त असणे गरजेचे असून त्याने आता विश्रांती घ्यायला हवी असे गावस्करांचे म्हणणे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. मंगळवारी यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

दरम्यान, आयपीएलच्या अंतिम टप्प्यात रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकतो पण त्याने आता सध्या ब्रेक घ्यावा असे मला वाटते. त्याने  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी काही काळ ब्रेक घ्यायला हवा. त्याने आयपीएलमधील अखेरचे काही सामने खेळावेत, जेणेकरून त्याला विश्रांती घेण्याची संधी मिळेल, असे गावस्करांनी अधिक सांगितले. 

मुंबईचा सलग दुसरा पराभवआयपीएल २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरूवात चांगली झाली नव्हती. पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर संघाने विजयाची हॅटट्रिक मारली. परंतु पुन्हा एकदा मुंबईचा विजयरथ थांबल्याचे पाहायला मिळते. कारण मागील दोन सामन्यांत पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्याकडून संघाला पराभव स्वीकारावा लागला. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी होती. पण सलामीचा सामना खेळल्यानंतर पंजाबविरूद्धचा सामना वगळता आर्चर दुखापतीमुळे पुढील सामन्यांना मुकला आहे. मुंबईने ७ सामन्यांतील ३ सामने जिंकले असून रोहितचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. 

WTCच्या फायनलसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :सुनील गावसकररोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाआयपीएल २०२३
Open in App