ही खूप साधारण कॅप्टन्सी! गौतम गंभीर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर भडकला

Asia Cup 2023 Super 4 : पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला हार मानावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 05:05 PM2023-09-15T17:05:37+5:302023-09-15T17:06:22+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian players Gautam Gambhir criticised Pakistan skipper Babar Azam's captaincy during the PAK vs SL clash in Asia Cup 2023 Super 4 | ही खूप साधारण कॅप्टन्सी! गौतम गंभीर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर भडकला

ही खूप साधारण कॅप्टन्सी! गौतम गंभीर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर भडकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 Super 4 : पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला हार मानावी लागली आणि त्यांचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यावर जोरदार टीका केली आहे. श्रीलंकेने २ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् फायनलमध्ये प्रवेश केला. आता १७ सप्टेंबरला भारत-श्रीलंका यांच्यात जेतेपदाचा सामना होणार आहे.  


“माझ्यासाठी ही अगदी सामान्य कॅप्टन्सी होती. जमान खानच्या षटकात मिड-ऑफमध्ये चौकार मारला गेला आणि शाहीन शाह आफ्रिदीच्यालाही मिड-ऑफमध्ये चौकार मारला गेला. ते दोन्ही चेंडू संथ होते. जर तुमचा गोलंदाज संथ गोलंदाजी करत असेल, तर मिड-ऑफचा क्षेत्ररक्षक लाँग-ऑफवर ठेवा आणि थर्ड मॅनला वर आणा. हे कर्णधाराला कळायला हवं. कल्पना करा की शेवटच्या षटकात तुमच्या १३ धावा शिल्लक राहिल्या असत्या तर श्रीलंकेसाठी ते कठीण झाले असते,” अशा शब्दांत गंभीरने टीका केली.  


कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा यांच्यातील शतकी भागीदारीदरम्यान गंभीरने बाबरच्या निर्णयक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की,“पाकिस्तानच्या कर्णधाराने दृष्टिकोन अधिक आक्रमक असायला हवा होता. तुम्ही खेळ एका टप्प्यावर वाहून जाऊ देऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या सहाव्या गोलंदाजाचा कोटा पूर्ण करायचा होता. हे असे चालत नाही. जेव्हा कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा यांच्यात भागीदारी होत होती, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रमुख गोलंदाजांना आणून विकेट घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता,” असेही गंभीर म्हणाला.


श्रीलंकेच्या गोलंदाजानंतर फलंदाजांनी कमाल करून दाखवली अन् पाकिस्तानला अक्षरशः शरणागती पत्करण्यास भाग पाडले. गचाळ क्षेत्ररक्षण, दिशाहीन गोलंदाजीने कर्णधार बाबर आजमही हैराण झाला होता आणि त्यानेही मनातून पराभव पत्करला होता. त्याच्या देहबोलीतून हे स्पष्ट जाणवत होते. इफ्तिखार अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी विकेट्स घेत पाकिस्तानच्या आशेचा किरण जागवल्या होत्या. पण, चरिथ असलंकाने २ चेंडूत ६ धावांची गरज असताना डोकं शांत ठेवून खेळ केला अन् सामना जिंकला.  श्रीलंका ११ वेळा फायनलमध्ये पोहोचली आहे.

 

Web Title: Former Indian players Gautam Gambhir criticised Pakistan skipper Babar Azam's captaincy during the PAK vs SL clash in Asia Cup 2023 Super 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.