"बंधुत्व म्हणजेच सर्वस्व...", भारतीय खेळाडूंनी पंतची घेतली भेट; रैनाच्या कॅप्शननं जिंकली मनं

 rishabh pant news : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत सध्या विश्रांती घेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 12:19 PM2023-03-26T12:19:51+5:302023-03-26T12:21:10+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian players Suresh Raina, S Sreesanth and Harbhajan Singh meet Rishabh Pant, see photos   | "बंधुत्व म्हणजेच सर्वस्व...", भारतीय खेळाडूंनी पंतची घेतली भेट; रैनाच्या कॅप्शननं जिंकली मनं

"बंधुत्व म्हणजेच सर्वस्व...", भारतीय खेळाडूंनी पंतची घेतली भेट; रैनाच्या कॅप्शननं जिंकली मनं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

rishabh pant । मुंबई : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत सध्या विश्रांती घेत आहे. कार अपघातानंतर त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून तो सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पंत सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून त्याच्या आरोग्याबाबत अपडेट्स देत असतो. अपघातानंतर सावरत असलेल्या पंतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भारताच्या माजी खेळाडूंनी काल हजेरी लावली. सुरेश रैनाने याबाबतचा फोटो पोस्ट केला आहे. 
 
"बंधुत्व म्हणजेच सर्वस्व" 
दरम्यान, शनिवारी सुरेश रैना, हरभजन सिंग आणि श्रीसंत हे भारतीय खेळाडू पंतला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. रैनाने पंतसोबतचा एक फोटोही शेअर केला असून एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये रैनाने लिहिले, "बंधुत्व हेच सर्वस्व आहे. जिथे आपले हृदय असते तेच आपले कुटुंब असते. आमचा भाऊ रिषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत."


 
याआधी भारताचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगने देखील पंतची भेट घेतली होती. पंत लवकर बरा व्हावा, अशा शुभेच्छाही त्याने दिल्या. युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत लवकरच पुनरागमन करेल आणि पुन्हा चमकेल, असे युवराज म्हणाला होता. या अपघातामुळे पंत यंदाच्या आयपीएललाही मुकणार आहे. त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Yuvraj Singh meets Rishabh Pant, shares picture with India star: This champion is going to rise again - India Today

30 डिसेंबरला झाला होता अपघात
मागील वर्षाच्या अखेरीस 30 डिसेंबर रोजी पंत रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. उत्तराखंडमधील रुरकीजवळ त्याच्या कारला अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. प्राथमिक उपचारानंतर बीसीसीआयने त्याला मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सध्या पंत त्याच्या घरी विश्रांती घेत आहे. अलीकडेच त्याने स्विमिंग पूलमधील व्हिडीओ शेअर करून लवकरच बरे होणार असल्याचे संकेत दिले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Former Indian players Suresh Raina, S Sreesanth and Harbhajan Singh meet Rishabh Pant, see photos  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.