न्यूझीलंड संघाने फलंदाजांच्या आक्रमक फटकेबाजीवर आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतावर दुसऱ्या कसोटी सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला होता. न्यूझीलंडने वन- डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही 2-0 असा विजय मिळवून भारताला व्हाइटवॉश दिला होता. भारताच्या या मानहानीकारक परभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी विकेटकीपर ऋषभ पंतला वारंवार संधी देण्याबाबत टीका केली आहे.
संदीप पाटील 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, भारतीय संघ व्यावस्थापन ऋषभ पंतला जास्त संधी देताना विकेटकीपर आणि फलंदाज रिद्धिमान साहाचं करिअर धोक्यात घालत आहे. तसेच परदेशात खेळत असताना एका अनुभवी विकेटकीपरची संघाला आवश्यकता असते. त्यामुळे ऋषभ पंतच्या एवजी रिद्धिमान साहाला संधी देण्याची आवश्यकता होती असं मत संदीप पाटील यांनी व्यक्त केलं आहे. साहाने नेहमीच संघासाठी चांगले काम केले आहे. मात्र तरीही भारतीय व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास का ठेवत नाही असा सवालही संदीप पाटील यांनी उपस्थित केला आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनेने न्यूझीलंड दौऱ्यात अनुभवी रिद्धिमान साहाला संघात जागा न देता ऋषभ पंतला संधी दिली होती. मात्र पंतला चांगली या दौऱ्यात देखील चांगली कामगिरी करता आली नाही. पंतला दोन कसोटी सामन्यात केवळ 60 धावा करता आल्या आहे. त्यामुळे संदीप पाटील यांनी भारतीय संघ व्यवस्थापन आणि विराट कोहलीवर निशाणा साधला.
भारताने 5 सामन्यांच्या ट्वेंटी- 20 मालिकेत न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला होता. मात्र, वनडे मालिकेत आणि त्यापाठोपाठ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही भारताला 2- 0 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
Web Title: Former Indian selection chief Sandeep Patil has said that Wriddhiman Saha's career is getting worse due to wicketkeeper Rishabh Pant mac
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.