Join us

... तर रोहित शर्मा बार्बाडोसच्या समुद्रात उडी मारेल! सौरव गांगुलीच्या विधानानं उंचावल्या भुवया

भारतीय संघ शनिवारी दुसरा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 20:03 IST

Open in App

भारतीय संघ शनिवारी दुसरा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. बार्बाडोसच्या केनसिंग्टन ओव्हल स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जेतेपदाची लढत होणार आहे. २००७ नंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा आणि २०१३ नंतर आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाली आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी स्पर्धेतील ट्रॉफी जिंकेल असा सर्वांना विश्वास आहे.

मागच्या वर्षी घरच्या मैदानावर झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदाच्या अगदी नजीक पोहोचली होती, परंतु अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. पॅट कमिन्सच्या संघाने १४० कोटी भारतीयांना शांत केले होते. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण झालेले पाहायला मिळाले होते. पण, अवघ्या ७ महिन्यांत टीम इंडियाने भरारी घेऊन आणखी एक वर्ल्ड कप फायनल गाठली आहे. 

India vs South Africa Final पूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) भारतीय संघाच्या स्पर्धेतील वर्चस्वावर आनंद व्यक्त केला आणि यावेळी भारतीय संघ जेतेपद जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. पण, त्याचवेळी त्याने जर भारतीय संघ अपयशी ठरला, तर कर्णधार रोहित समुद्रात उडी मारेल, असेही गमतीने म्हणाला. “मला वाटत नाही की तो सात (सहा) महिन्यांत दोन वर्ल्ड कप फायनल गमावेल. सात महिन्यांत त्याच्या नेतृत्वाखाली दोन फायनल हरल्यास तो कदाचित बार्बाडोस महासागरात उडी घेईल,”अशी गांगुलीने गंमत केली.  

सुपर ८ आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग सामने जिंकून आघाडीवर राहिल्याबद्दल गांगुलीने रोहितचे कौतुक केले. “त्याने फ्रंटला राहून नेतृत्व केले आणि शानदार फलंदाजी केली. मला आशा आहे की ते उद्याही दमदार खेळ करेल. आशा आहे की भारताला अपेक्षित निकाल मिळेल आणि त्यांनी मनमोकळेपणाने खेळावे,''असा सल्ला गांगुलीने दिले.    

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासौरभ गांगुलीरोहित शर्मा