Join us  

आयपीएस अधिकाऱ्याविरोधात महेंद्रसिंग धोनीची उच्च न्यायालयात याचिका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 9:58 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni)आयपीएस अधिकारी संपत कुमार (Sampath Kumar यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महेंद्रसिंग धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्यावर वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित आहे. 

न्यायालयाने या प्रकरणीची सुनावणी मान्य केली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपासून होणार आहे. दरम्यान, आयपीएल 2013 मध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणसमोर आले होते. या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी संपत कुमार करत होते. याप्रकरणी त्यांनी महेंद्रसिंग धोनीवरही टिप्पणी केली होती. यानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता की, आयपीएस अधिकारी संपत कुमार यांनी स्पॉट फिक्सिंगवरून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याविरोधात खोट्या बातम्या आणि खोटी वक्तव्ये करत असल्याचेही  महेंद्रसिंग धोनीने म्हटले होते.

याप्रकरणी महेंद्रसिंग धोनीने कोर्टाकडे 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागितली होती. 2014 मध्ये न्यायालयाने संपत कुमार यांना महेंद्रसिंग धोनीविरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास मनाई केली होती. मात्र, यानंतरही संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. ज्यामध्ये न्यायालयीन व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्याविरुद्धच्या खटल्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख वकील यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती. या प्रकरणाची मंगळवारपासून संपूर्ण सुनावणी होणार आहे.

महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2023 मध्ये सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीन्यायालय
Open in App