Join us  

धोनीनं ८८ वर्षीय 'फॅन' आजीबाईंच जिंकलं मन; भाजपा नेत्यानं फोटो शेअर करत मानले आभार

MS Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रसिद्धी जगजाहीर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 2:40 PM

Open in App

khushbu sundar | नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रसिद्धी जगजाहीर आहे. कॅप्टन कूल धोनीचे चाहते जगभरात आहेत. धोनीला त्याच्या स्फोटक खेळीसाठी आणि शांत स्वभावासाठी ओळखले जाते. अलीकडेच त्याने आयपीएलमध्ये (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार म्हणून २००वा सामना खेळला. मात्र, या सामन्यात धोनीच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर धोनीने दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदरची भेट घेतली. यादरम्यान धोनीने अभिनेत्रीच्या (khushbu sundar twitter) सासूशी देखील चर्चा केली, जी माहीची खूप मोठी फॅन आहे. खुशबूने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

८८ वर्षीय चाहत्याची घेतली भेट खुशबूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळते की, धोनी आपल्या ८८ वर्षीय चाहत्याशी चर्चा करत आहे. खुशबूने फोटो शेअर करताना लिहले, "हिरो बनवले जात नाहीत, ते जन्माला येत असतात. धोनी हेच सिद्ध करतो. आमच्या सीएसकेच्या धोनीसाठी आमच्याकडे शब्द नाहीत. फोटोत दिसणारी माझी सासू आहे, जी ८८ वर्षांची असून धोनीची पूजा करत असते. माहीने आम्हाला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार."

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला ४ सामन्यांतील २ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध चेन्नईने विजय मिळवला आहे. चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या होत्या. १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने २० षटकांत ६ बाद १७२ धावा केल्या आणि संघाला ३ धावांनी पराभव पत्करावा लागला.

अखेरच्या षटकात मोठा ट्विस्टराजस्थान आणि चेन्नई यांच्या सामन्यातील अखेरचे षटक महत्त्वाचे ठरले. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ६ चेंडूत १९ धावांची आवश्यकता होती. खेळपट्टीवर धोनी होता पण समोर संदीप शर्माचे आव्हान होते. धोनीची स्फोटक फलंदाजी पाहून गोलंदाज दबावात येतो. संदीप शर्मा देखील अखरचे षटक टाकताना दडपणात दिसला आणि त्याने सलग दोन Wide चेंडू टाकले. त्यानंतर धोनीने सलग दोन षटकार खेचले अन् ३ चेंडू ७ अशी मॅच आली. १ चेंडूंत ५ धावांची गरज असताना माही स्ट्राईकवर आला अन् धोनीला एकच धाव घेता आली. चेन्नईने ६ बाद १७२ धावा केल्या अन् राजस्थानने ३ धावांनी जिंकला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सभाजपासोशल व्हायरलऑफ द फिल्ड
Open in App