मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याला क्रिकेट बेटिंगप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. 1995 ते 2007 या कालावधीत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील माजी खेळाडूनं 44 सामने खेळले. आयपीएल सामन्यावर बेटिंगप्रकरणी त्याच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
वर्सोवा येथील राहत्या घरी मॉरिस बेटिंग लावत असल्याची टीप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप व मोबाईल फोनही जप्त केले.'' आयपीएल मॅचवर बेटिंग प्रकरणात मॉरिसचा सहभाग आहे,''अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली.
मागील वर्षी अल जझीरा TVनं केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्येही मॉरिस स्पॉट फिक्सिंग करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्याच्यासह पाकिस्तानचा माजी फलंदाज हसन रझा हाही होता. मॉरिसनं हे सर्व आरोप फेटाळले आणि एका चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यानचा तो व्हिडीओ असल्याचे त्यानं सांगितले.
यापूर्वीही ICLमध्ये तो खेळला होता. गतवर्षी त्याच्यासह चार जणांना दोन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक केले होते.
मुंबई इंडियन्स भिडणार दिल्ली कॅपिटल्सला Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वाच्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांच्यात सामना रंगणार आहे. DCनं क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघावर 17 धावांनी विजय मिळवला.