मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक वासू परांजपे ( Vasoo Paranjape ) यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी २९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत बदोडा व मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या कारकिर्दीतील यशात परांजपे यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी दोन शतकं व एका अर्धशतकासह ७८५ धावा केल्या आणि ९ विकेट्सही घेतल्या.
सुनील गावस्कर यांना सन्नी हे टोपण नाव ज्यांनी दिलं त्यांच्यावर त्यांचा मुलगा व जतिन परांजपे यांनी Cricket Drona: For the Love of Vasoo Paranjape हे पुस्तक लिहिले. निवृत्तीनंतर परांजपे प्रशिक्षणाकडे वळले. एकदा त्यांनी १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची मुश्ताक अली यांना ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले होते, की हा सुनील गावसकरानंतर देशातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे. केवळ भारतीय खेळाडूंनाच नव्हे त्यांनी श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, रोशन महानामा यांनाही मार्गदर्शन दिले.
वानखेडे स्टेडियमवर १७ वर्षांखालील क्रिकेट शिबिरात ३० पैकी १५ जणांची संघात निवड होणार होती. तेव्हा रोहित नेट्समध्ये फलंदाजी करत होता आणि परांजपे त्याची फलंदाजी पाहत होते. त्यांनी मुंबई संघाचा तत्कालिन कर्णधार प्रशांत नाईक याला रोहित संघात असायला हवा असे सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे प्रशांत नाईक रोहितला ओळखतही नव्हता, तरीही परांजपे सरांच्या सांगण्यावरून रोहितला संधी मिळाली.
Web Title: Former Mumbai cricketer Vasoo Paranjape passes away
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.