मागील १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या न्यूझीलंडच्या माजी ऑलराउंडर ख्रिस केन्सला ( Chris Cairns) याला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्याच्यावर सिडनी येथे उपचार सुरू आहेत आणि हृदयविकाराची शस्त्रक्रिया सुरू असताना त्याच्या पायांना अर्धांगवायूचा झटका आला. ( Chris Cairns paralysed after stroke during heart surgery)
१० ऑगस्टला ख्रिस क्रेन अचानक कोसळला अन् त्याला आता लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. ५१ वर्षीय ख्रिसवर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रीय झाल्या आहेत. ख्रिसला हृदयासंदर्भातील समस्या असल्यानं त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आल्या होत्या, परंतु त्याच्या शरीरानं अपेक्षित प्रतिसाद न दिल्यानं त्याची प्रकृती खालावली होती, असे एका इंग्रजी वेबसाईटनं सांगितले होते. ख्रिसच्या हृदयातील मुख्य धमणीला इजा झाली असून अशा समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये aortic dissection असे म्हणतात.
त्यानं १९८९ ते २००६ दरम्यान न्यूझीलंडकडून २ ट्वेंटी-२०, ६२ कसोटी आणि २१५ वन डे सामने खेळले आहेत. नंतर तो समाचोलक म्हणून काम करायचा. कसोटीत त्यानं ५ शतकं व २२ अर्धशतकांसह ३३२० धावा केल्या आणि २१८ विकेट्स घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४ शतकं व २६ अर्धशतकांसह ४९५० धावा व २०१ विकेट्स आहेत.
२००८ साली भारतात खेळवण्यात आलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंढीगड लायन्स संघाकडून खेळताना त्याच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप लावण्यात आले. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले होते आणि कायदेशीर लढाईही लढला होता. उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्याला बस डेपोंची साफसफाईचे काम करावे लागत असल्याच्या बातम्या २०१४मध्ये समोर आल्या होत्या.
Web Title: Former New Zealand all-rounder Chris Cairns paralysed after life-saving surgery
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.