जगभरात आतापर्यंत 9 लाख 35, 957 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 47,245 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैली 1 लाख 94,286 जण बरी झाली आहेत. या कोरोना व्हायरसच्या संकटात न्यूझीलंडचा फलंदाज डॅनियल फ्लिनने क्रिकेट कारकिर्दीला रामराम केला आहे. 34 वर्षीय फ्लिनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
फ्लिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्याला छाप पाडता आली नाही. डावखुऱ्या फलंदाजानं 2008मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं 24 कसोटी, 20 वन डे आणि 5 ट्वेंटी-20 सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 5 अर्धशतकं झळकावली, तर वन डे क्रिकेटमध्ये त्याची वेस्ट इंडिजविरुद्धची 95 धावांची सर्वोत्तम खेळी आहे. 2013नंतर त्याला टीम इंडियात पुनरागमन करता आले नाही
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला दमदार कामगिरी करता आली नसली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. नॉर्दन डिस्ट्रीक्ट संघाचे प्रतिनिधित करताना त्यानं 135 प्रथम श्रेण, 113 लिस्ट ए आणि 109 ट्वेंटी-20 सामने खेळले. त्यात त्यानं 7815 धावा केल्या. त्यात 20 शतकांचा समावेश आहे. नॉर्दन डिस्ट्रीक्टकडून सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं 2753 धावा केल्या आहेत.