नवी दिल्लीः न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची तयारी दर्शवली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकपदासह साहाय्यक प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. सूत्रांच्या माहितीनुसार हेसन हे मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार आहेत.
न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून हेसन आघाडीवर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड संघाने 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सहा वर्ष ते न्यूझीलंडच्या प्रशिक्षकपदावर कार्यरत होते. 2018 मध्ये त्यांचा करार संपला. सध्या ते इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मार्गदर्शन करत आहेत.
दरम्यान, हेसन यांनी कॉफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ( हितसंबंध जपणे) या मुद्यातून मुक्तता व्हावी यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांच्याबाबतीतही हाच मुद्दा समोर आला होता. त्यांनीही भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. पण, क्रिकेट सल्लागार समितीच्या शिफारशीनंतरही त्यांना हे पद मिळाले नाही, त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास विलंब झाला.
''भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी काम करण्यासाठी हेसन इच्छुक आहेत. बीसीसीआयनं त्यांना या पदासंदर्भात सर्व कल्पना दिलेली आहे. त्यामुळे लवकरच ते या पदासाठी अर्ज पाठवतील,''असे सूत्रांनी सांगितले.
Poll: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सर्वोत्तम पर्याय कोण वाटतो?
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहावे, ही तर बीसीसीआयचीच इच्छा? कारण..
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकिय समितीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसह अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद कायम राहणार की त्यांच्या जागी नवीन प्रशिक्षक येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांची जोडी तोडणं भारतीय संघाच्या हिताचे नाही, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अधिकाऱ्यांना वाटत आहे.
IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,'' कोहली-शास्त्री जोडी 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत कायम ठेवयला हवी. कोणत्याही पदावर कोणीही कायमस्वरुपी राहू शकत नाही. कोहली आणि शास्त्री हे एकमेकांना चांगले ओळखतात आणि त्यांच्यातील समन्वय हा अत्यंत चांगला आहे. त्यामुळे ही जोडी तोडणं चुकीचं ठरेल.''
Web Title: Former New Zealand coach Mike Hesson set to apply for Team India's head coach position: Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.